banana google
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : तब्बल दोन वर्षांनी केळीला ‘अच्छे दिन’

२० ते २२ रुपये प्रति डझन दराने विक्री

सकाळ वृत्तसेवा

नवेखेड : गेली दोन वर्षे केळीच्या दराचा सुरू असलेला वनवास संपला आहे. जिल्ह्यात जवळपास २० ते २२ रुपये प्रतिडझन इतक्या दराने केळीची विक्री सुरू आहे. श्रावण महिन्याच्या सुरवातीलाच चांगला दर मिळाल्याने वर्षभर हे दर स्थिर राहतील, असा जाणकारांचा अंदाज आहे

गेली दोन वर्षे केळीला प्रतिटन सात हजार रुपये इतका कमी दर मिळत होता. अनेकांचा उत्पादनखर्च अंगावर येत होता. कोरोनामुळे प्रामुख्याने ही स्थिती उद्‌भवली होती. देशाबाहेर व राज्याबाहेर केळीची विक्री प्रामुख्याने बंद झाली होती. त्यामुळे केळीचे दर पडले होते. कमी दर, महापूर, अवकाळी पाऊस यामुळे अनेक शेतकऱ्यांनी केळीची लागवड बंद केली होती. जिल्ह्यात प्रामुख्याने ‘जी-९’ या वाणाच्या केळीची लागवड केली जाते. राज्यभर केळीची लागवड मर्यादित राहिल्याने मालाला मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे केळीचे दर प्रतिटन वीस हजार ते २२ हजार रुपये इतक्या विक्रमी पातळीवर पोचले आहेत. एरव्ही माल नेण्यासाठी व्यापाऱ्यांच्या मागे लागणारे शेतकरी दृष्टीस पडायचे.

आता स्वतः व्यापारी आता शेतकऱ्यांना शोधत येऊ लागला आहे. त्याच्याकडून रोख रक्कम देऊन केळी खरेदी जात आहे. लागवडीपासून अकरा महिन्यांत उत्पादन देणारे केळी हे नगदी पीक आहे. रोपे, मशागत खते याचा खर्च जवळपास एकरी एक ते दीड लाख रुपये येतो. बऱ्याच वर्षांनी केळीला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या समाधानाचे वातावरण आहे. वर्षभर हे दर टिकून राहतील, असा अंदाज आहे.

मागणी वाढल्याने दर चढे आहेत. मागील दोन-तीन वर्षांत शेतकऱ्यांना निर्यात बंदीचा मोठा फटका बसला होता. दर वाढल्याने शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होईल.

- बिभीषण पाटील,केळी शेतीचे मार्गदर्शक, बावची

आता दर वाढले आहेत. परंतु शेतकऱ्यांकडे केळी कमी आहेत.असे दर वाढण्यापेक्षा प्रतिटन किमान १३ ते १५ हजार रुपये इतका हमीभाव मिळावा, यासाठी सरकारने कायदा करणे गरजेचे.

- विश्वासराव पाटील, प्रगतशील शेतकरी, उरूण इस्लामपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर अद्याप कारवाई नाहीच; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची माहिती

Drowning Accident: पोहायला गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू; लाव्हा येथील घटनेने समाजमन सुन्न

Monsoon Rain : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा, पुढील 3 दिवस कसे असेल हवामान?

Student Survey: 'सातारा जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण'; गळती शून्यावर आणण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न

Amravati Crime: महिलेची गळा आवळून हत्या; कपड्याने हातपाय होते बांधलेले

SCROLL FOR NEXT