sangli sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli : लाचखोर जाळ्यात; मुख्य सूत्रधार नामानिराळे

कडेगाव तहसीलमध्ये लाचखोरीची मालिका; नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया

संतोष कणसे

कडेगाव : येथील तहसील कार्यालयातील लाचखोर कारकून सुनील चव्हाण दहा हजारांची लाच घेताना जाळ्यात सापडला असला, तरी यातील मुख्य सूत्रधार मात्र नामानिराळे राहिले आहेत. तेव्हा याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सखोल चौकशी करून कडेगाव तहसील कार्यालयाला लागलेली लाचखोरीची कीड कायमची नष्ट करावी, अशी मागणी आता नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

तत्कालीन मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी आपली राजकीय ताकद पणाला लावून कडेगावसारख्या दहा हजार लोकवस्तीच्या शहराला तालुक्याचा दर्जा मिळवून दिला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी येथे नवीन इमारतीत तहसील कार्यालयासह सर्व शासकीय विभागाची कार्यालये सुरू केली. यामध्ये लोकांची कामे तत्काळ मार्गी लागावीत, त्यांच्या वेळेची व पैशांची बचत व्हावी, असा त्यांचा हेतू होता.

यापैकी तहसील कार्यालयाचे कामकाज सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. येथे कागदावर ‘वजन’ ठेवल्याशिवाय कागद पुढे सरकत नाही, असे नागरिकांतून उघडपणे बोलले जात आहे. अशा रीतीने तहसिल कार्यालयातील लाचखोरी काही थांबायचे नाव घेत नसून येथे वारंवार लाचखोरीची प्रकरणे घडत आहेत. त्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई करीत आहे. परंतु आतापर्यंत येथील मुख्य सूत्रधारावर कधी कारवाई झालीच नाही. त्यामुळेच अनेकवेळा कारवाई होऊनही येथील लाचखोरीची कीड कायमची नष्ट होत नसल्याचे बोलले जात आहे. तेव्हा वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन येथील मुख्य सूत्रधारासह लाचखोरांवर कठोर कारवाई करावी व येथील लाचखोरीची कीड कायमची संपवावी,अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

सत्ताधारी-विरोधकांची गांधारीची भूमिका

कडेगाव तहसील कार्यालयात लाचखोरीची मालिका सुरू आहे. असे असताना वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांसह सत्ताधारी व विरोधकांनीही घेतलेल्या गांधारीच्या भूमिकेबद्दल तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT