Sangli Civil Hospital
Sangli Civil Hospital sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : सिव्हिल हॉस्पिटलला हवा सुविधांचा ‘बूस्टर डोस’

सकाळ वृत्तसेवा

सांगली: सांगलीसह आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेचे प्रमुख केंद्र असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलचा विस्तार होतोय. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा ५०० बेडचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. तो काही महिन्यांत मंजूर होऊन काम सुरू होईल; परंतु सध्या येथे नर्सिंग व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ‘सिटी स्कॅन’ व ‘एमआरआय’साठी रुग्ण व नातेवाइकांना धावपळ करावी लागते. तसेच इतर काही सुविधांचा अभाव जाणवतो. या सुविधांचा ‘बूस्टर डोस’ सिव्हिलला संजीवनी देऊ शकतो.

वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्न असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलची स्थापना १९६३ मधील आहे. हॉस्पिटलवर सध्या रुग्णसेवेचा ताण जाणवतोय. सांगलीसह शेजारील कोल्हापूर, बेळगाव, सोलापूर व कोकण भागातील रुग्ण येथे उपचारासाठी येतात. दररोज सरासरी हजार रुग्णांची ‘ओपीडी’ असते; तर रोज १२० ते १३० रुग्ण वेगवेगळ्या उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी दाखल होतात. रोज दाखल होऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४२० ते ४४० इतकी असते. गरीब रुग्णासह मध्यमवर्गीय तसेच बऱ्याचदा श्रीमंत रुग्णही येथे चांगले उपचार मिळतात म्हणून दाखल होत आहेत. त्यामुळे सिव्हिलच्या रुग्णसेवेची ख्याती दूरवर आहे, परंतु या हॉस्पिटलला सध्या अतिरिक्त सुविधांचा ‘बूस्टर डोस’ आवश्‍यक भासू लागला आहे.

५०० बेडचा प्रस्ताव

‘सिव्हिल’चे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर केले जाणार आहे. पाचशे बेडचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये अद्ययावत शवविच्छेदन कक्ष व शवागार, शिकाऊ डॉक्टरांचे वसतिगृह, आयसीयू बेड आदी सुविधा असणार आहेत.

वर्षात ७ हजार प्रसूती

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्त्री रोग विभागात सर्वाधिक रुग्ण दाखल होतात. त्याखालोखाल औषध विभाग, शस्त्रक्रिया विभागात रुग्ण दाखल होतात. वर्षभरात तब्बल ७ हजार महिलांची सिव्हिलमध्ये प्रसूती होते. ‘सिझेरियन’ टाळण्यासाठी बऱ्याच महिला येथे दाखल होतात, अशी ख्याती आहे.

‘डीएसए’ मशिनची प्रतीक्षा

‘डिजिटल सबस्ट्रॅक्शन ॲंजिओग्राफी’ मशिनसाठी पैसे वर्ग केले आहेत, परंतु अद्यापही मशिन सिव्हिलमध्ये दाखल नसून त्याची प्रतीक्षा आहे.

स्कॅन, ‘एमआरआय’ची प्रतीक्षा

सिव्हिलमध्ये दाखल रुग्णांचा सिटी स्कॅन व एमआरआय करण्याची गरज भासल्यास मिरजेला धावपळ करावी लागते. सिटी स्कॅन मशिनचा प्रस्ताव मंजूर असून, पैसे वर्ग झालेत. टेंडर प्रक्रिया सुरू असून आणखी काही काळ लागू शकतो. एमआरआयचा प्रस्ताव पाठवला असून, त्यावर अद्याप निर्णय झाला नाही.

ओळखीविना उपचार हवेत

सिव्हिलमध्ये डॉक्टरांची ओळख असेल, तर चांगले उपचार मिळतात, असा अनेकांना अनुभव आहे; परंतु ओळख नसणाऱ्यांचे काय, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. सरसकट सर्वांना चांगल्या रुग्णसेवेचा अनुभव मिळावा, अशी अनेकांची मागणी असते.

अपुरे मनुष्यबळ

परिचारिका मंजूर पदे ३९९, रिक्त पदे-११२

चतुर्थश्रेणी कर्मचारी ५० टक्के पदे रिक्त

प्रोफेसर १८ ते २०

असोसिएट प्रोफेसर ३५ ते ४०

असिस्टंट प्रोफेसर ७० त ८०

‘सिव्हिल’ एका नजरेत

एकूण कार्यरत विभाग २८

रोज उपचार घेणारे रुग्ण ४२० ते ४४०

रोज दाखल होणारे १२० ते १३०

रोजची ओपीडी १ ते ११०० हजार

योजना

महात्मा फुले आरोग्य योजना

जननी शिशू सुरक्षा योजना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT