Sangli District Central Bank
Sangli District Central Bank Sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : ‘केन ॲग्रो’ला पुन्हा कर्ज देण्यास विरोध

सकाळ वृत्तसेवा

सांगली: भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या केन ॲग्रो साखर कारखाच्या थकीत कर्जाचे पुनर्गठण करणे व व्याजमाफी देण्याबाबत उद्या (ता. १९) होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत विषय घेतला होता. मात्र, याला सर्वपक्षीय १४ ते १५ संचालकांनी जोरदार विरोध केल्याची खात्रीलायक गोटातून माहिती मिळाली. संचालकांनी बैठकीवर बहिष्काराच्या इशाऱ्याने अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक सावध झाले असल्याचे समजते. त्यांनी बैठकीचा अजेंडा रात्रीत बदलला असून, केन ॲग्रोचा विषय वगळल्याचे काही संचालकांनी खासगीत सांगितले.

जिल्हा बॅँकेची विशेष सर्वसाधारण सभा उद्या ऑनलाईन होत आहे. या सभेत शेतकऱ्यांसाठी ओटीएस योजना, द्राक्ष-डाळिंब उत्पादकांसाठी कर्ज पुनर्गठण योजनेवर शिक्कामोर्तब होईल. याबरोबर अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या टॉप थर्टी कर्ज प्रकरणाची सुमारे ७६ कोटींची थकबाकी राईट ऑफ करण्याचा विषयही सभेत आणला आहे.

यासह काही विषयांवरून ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.थकीत कर्जे राईट ऑफ करण्याच्या निर्णयावरून जिल्हा बॅँकेवर राज्यभरातून टीका होत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्या केन ॲग्रो साखर कारखान्याच्या थकीत कर्जाचे पुनर्गठण करण्याचा व व्याजात सवलत देण्याच्या प्रस्तावासह अन्य विषयांवर निर्णय घेण्यासाठी उद्या सकाळी अकराला संचालक मंडळाची बैठक बोलवली होती. या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करून लगेच दुपारी होणाऱ्या ऑनलाईन विशेष सभेत याला मंजुरी घेण्याचा प्रयत्न सुरू होता.

पृथ्वीराज देशमुख यांच्या केन ॲग्रो एनर्जी कंपनीला जिल्हा बॅँकेने १६५ कोटींचे कर्ज दिले आहे. व्याजासह २०४ कोटींची थकबाकी आहे. वसुलीसाठी बॅँकेने सिक्युरिटायझेन ॲक्ट अंतर्गत कारखाना ताब्यात घेऊन त्याच्या विक्रीची प्रक्रिया सुरू केली होती. दरम्यान, कारखाना दिवाळखोरीत निघाल्याने कंपनी कायद्यांतर्गत कारखान्याची सर्व मालमत्ता नॅशनल कंपनी लॉ ट्रीब्युनलने (एनसीएलटी) ताब्यात घेतली आहे. केन ॲग्रोची देणी देण्यासाठी ‘एनसीएलटी’ने प्रशासक नियुक्त करून कारखान्याला कर्जपुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्था, तसेच अन्य देणेकरी यांच्याकडून प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार जिल्हा बॅँकेनेही व्याजासह २०४ कोटींच्या वसुलीचा दावा ‘एनसीएलटी’कडे केला होता. १६५ कोटींची मूळ मुद्दल पुढील १० ते १२ वर्षांत हप्ते पाडून भरण्याची मुदत द्यावी, या कर्जावर सात टक्के व्याज आकारणी करावी, तसेच आजपर्यंतच्या ३९ कोटींच्या थकीत व्याजातील काही रक्कम माफ करावी, अशी मागणी केन ॲग्रोने केली आहे.

केन ॲग्रोच्या प्रस्तावास मान्यता देण्याबाबत उद्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय होणार होता. मात्र, या विषयाला सर्वपक्षीय १४ ते १५ संचालकांनी जोरदार विरोध केला, अशी माहिती आहे. केन ॲग्रोची थकबाकी गेल्या चार-पाच वर्षांतील आहे. ती वसूल करावी, कारखान्याच्या संचालकांच्या मालमत्तेवर टाच आणावी, अशी मागणी करीत कर्ज पुर्नगठणास व व्याजमाफीस नकार दिल्याने रात्रीत सभेचा अजेंडा बदलल्याचे सांगण्यात आले. त्यावरील केन ॲग्रोचा विषय वगळून विशेष सभेसाठी आलेल्या प्रश्नांवर चर्चा करणे हा एकच विषय ठेवला आहे.

अजेंडा बदलण्यास कडू यांचा विरोध, पुण्याला रवाना

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू यांनी उद्याच्या (ता. १९) सभेपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ते उद्याची सभा करून जाणार होते. मात्र, मुंबईत बॅँकेचे अध्यक्ष आमदार नाईक यांच्यासह काही संचालक व पालकमंत्री यांची बैठक झाली. त्यास नूतन ‘सीईओ’ हजर होते, पण कडू यांना बोलवले नाही, त्यामुळे ते संतप्त झाले. त्यांनी तातडीने बॅँक सोडण्याचा निर्णय घेतला. आमदार नाईक यांची थांबण्याची विनंती त्यांनी फेटाळली. संचालक मंडळाच्या बैठकीचा अजेंडा बदलण्यास कडू यांनी विरोध केला. यावरून नाईक व कडू यांच्यात खडाजंगी झाली. कडू यांनी जुन्या तारखेनुसार अजेंडा बदलण्यास मान्यता दिली; पण आपण बॅँकेत थांबणार नसल्याचे सांगत ते आज पहाटे पुण्याला रवाना झाल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT