grape.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात गारपीटीने 790 शेतकऱ्यांचे वाचा एवढे झाले नुकसान 

सकाळवृत्तसेवा


सांगली ः जिल्ह्यात गारपीट आणि पावसाने शेतीचे गेल्या पाच दिवसात मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये तासगाव, खानापूर व मिरज तालुक्‍यातील द्राक्ष शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार 790 शेतकऱ्यांचे 265 एकरातील द्राक्ष, 10 हेक्‍टरमधील भाजीपाला, 25 हेक्‍टरमधील ऊसाचा समावेश आहे. या शिवाय आंबा व फुल शेतीचेही नुकसान झाले आहे. नुकसानीचे क्षेत्र वाढत असल्यामुळे आणखी दोन दिवस पंचनाम्यासाठी लागतील, अशी माहिती देण्यात आली. 
जिल्ह्यात रविवारी जोरदार गारपीट झाली. त्यानंतर दोन दिवस निसर्ग चक्री वादळाच वादळी पाऊस झाला. या पावसामुळे 265 हेक्‍टरवरील द्राक्ष, 10 हेक्‍टरवरील भाजीपाला, 25 हेक्‍टरमधील ऊस आणि एक हेक्‍टरवरील आंबा पिकांचा समावेश आहे. पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.

तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्‍यात द्राक्षच्या पिकलेल्या काडांची पाने गळून पडली आहे. भविष्यात ही काडी पक्क न झाल्याने मोठ्या नुकसानीला समोरे जावे लागणार आहे. शुक्रवारी ( ता. 5) आणि शनिवारी ( ता. 6) जिल्ह्यात हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. कृषी विभागाकडून पंचनामे गतीने सुरु आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आज काही ठिकाणी हलका पाऊस झाला. जिल्हा कृषी अधिक्षक बसवराज मास्तोळी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे कृषी सहाय्यक, तलाठ्यांकडून पिकांचे पंचनामे सुरु केले असून दोन दिवसात पंचनामे अंतिम होतील, असे सांगण्यात येत आहे. 

 
तालुकानिहाय... 
शेतकरी नुकसान संख्या- मिरज- 205, जत-60, विटा-190, तासगाव- 335. 
द्राक्ष नुकसान ( क्षेत्र हेक्‍टर)- मिरज- 52, जत-20, विटा-43, तासगाव- 150 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis: फलटणला सर्वात आधुनिक शहर बनवू: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; टीकाटिप्पणीपेक्षा विकास हा माझा अजेंडा!

ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये गोड ट्विस्ट! 5 मिनिटांत घरच्या घरी बनवा विना अंड्याची Brownie, लगेच ट्राय करा

Marathi Career Rashi Bhavishya: आजचा दिवस भाग्यवान! सूर्य–मंगळ संयोगामुळे 'या' राशींना मिळणार करिअर आणि आर्थिक फायदा

अग्रलेख - सरकारी माणिकशोभा!

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

SCROLL FOR NEXT