सांगली जिल्हा बँक sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : जिल्हा बँकेचं मिटलं, झेडपीचं घोडं अडलं!

बदलासाठी आग्रही गटाचे हालचालींकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा

सांगली : ‘भाजपला सहकारी संस्था निवडणुकीत रस नाही’ इथंपासून ते ‘भाजप स्वतंत्र पॅनेल करून लढणार’ इथंपर्यंतचा प्रवास आज पूर्ण झाला आहे. भाजपने जिल्हा बँकेत अखेर पॅनेल लावले. बँकेचा विषय मिटला, आता जिल्हा परिषदेतील बदलाचं घोडं मात्र अडलं आहे. बदलासाठी आग्रही गटाचे त्या हालचालींकडे लक्ष आहे.

जिल्हा परिषदेत बदलासाठी आग्रही आणि नव्याने पदाची अपेक्षा असणाऱ्या सदस्यांचे कोअर कमिटीकडे लक्ष लागले आहे. गेल्या एक महिन्यापासून या सदस्यांना आज, उद्या असे सांगितले जात आहे. आधी दिवाळीची सुटी मधे आली. त्यानंतर जिल्हा बँकेच्या घडामोडींचे कारण सांगितले गेले. आता तेही संपले. जिल्हाध्यक्ष ‘राजीनामा आले आहेत’, असे सांगतात. पदाधिकारी ‘आम्हाला राजीनामा द्या, असे आदेशच आले नाहीत’, असे सांगतात. त्यामुळे नेमके कोण कुणाला फसवत आहे, असा खासगीत आरोप आता सुरू झाला आहे.

दरम्यान, या बदलासाठी आग्रही नेते खासदार संजय पाटील यांना पितृशोक झाला आहे. त्यामुळे बदलासाठी आग्रही गटाची धुरा आमदार सुरेश खाडे आणि सत्यजित देशमुख यांनी खांद्यावर घेतली आहे. मकरंद देशपांडे यांनी या घडामोडीत समन्वय राखण्याची धडपड चालवली आहे. जिल्हा बँकेच्या पॅनेलची बांधणी आता संपली आहे. आता जिल्हा परिषदेचा विषय संपवा, अशी आग्रही मागणी या गटाने केली आहे. त्यामुळे कोअर कमिटी त्यावर निर्णय घेते की आता जिल्हा बँकेच्या प्रचाराचे कारण पुढे करते, याकडे लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT