In Sangli district, a fine of Rs 1.5 lakh has been recovered under All Out 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात ऑल आऊट अंतर्गत दीड लाखांचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा

सांगली - जिल्हा पोलिस दलातर्फे काल जिल्हाभर ऑल आऊट ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर अधीक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील उपाधीक्षक, सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. दोनशेवर जणांवर कारवाईचा बडगा उगरण्यात आला. तर 374 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे एक लाख 41 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. 

हॉटेल्स, ढाब्यांवर कारवाई

या ऑपरेशन दरम्यान जिल्ह्यातील विविध चौक, कॉर्नर, ब्रिज, बायपास रस्ता, जंक्‍शन येथे विशेष नजर ठेवली जात होती. 44 अधिकारी 354 पोलिस कर्मचारी आणि 42 होमगार्ड यांचा सहभाग होता. पोलिसांना चकवा देऊन पळणारे, चोरीच्या उद्देशाने फिरणारे, विना परवाना देशी दारू विक्री करणारे, जुगार-मटका अशा विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. विशेषतः वेळमर्यादेपेक्षा अधिक काळ हॉटेल्स, ढाबे सुरू ठेवणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. शहरातील पाच हॉटेल्स, ढाब्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 

374 वाहन चालकांवर कारवाई

शहरातील मुख्य चौकात नाकेबंदी करण्यात आली होती. हजारवर वाहनांची तपासणी करून 374 बेदकार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एक लाख 41 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पुढील टप्प्यात ही मोहीम व्यापक करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT