Oman Video Sakal Digital
पश्चिम महाराष्ट्र

Viral Video ओमानचा, बुडालेले तिघे जण सांगलीचे; सुट्टी बेतली जीवावर

जतमधील म्हमाणे कुटुंबातील व्यक्तींचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

जत : शहरातील सुपरिचित वकील राजकुमार म्हमाणे यांचे मोठे बंधू व त्यांची दोन मुलं ओमान देशातील एका समुद्रकिनारी फिरायला गेले असता लाटेत वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शशिकांत ऊर्फ विजयकुमार म्हमाणे, त्यांची नऊ वर्षांची मुलगी श्रुती व सहा वर्षांचा मुलगा श्रेयस अशी समुद्रात वाहून गेलेल्यांची नावे आहेत. रविवारी ही घटना घडली आहे. मात्र, त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला असता तर बुडालेल्या व्यक्तींचा शोध सुरू असल्याचे सांगितले जात आहे. (Oman viral Video)

शशिकांत म्हमाणे हे दुबई येथील इंटरनॅशनल कंपनीमध्ये अभियंता आहेत. याठिकाणी शशिकांत त्यांची पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती व अन्य एक मुलगी (नाव समजू शकले नाही) हे सर्व राहण्यास आहेत.रविवारी ईदची सुट्टी मिळाल्याने म्हमाणे कुटुंबासह इतर मित्र मंडळी ओमान देशात फॅमिलीसह फिरायला गेले होते. दरम्यान, येथील एका समुद्रकिनारी

लाटांचा आनंद घेत असताना मागून जोराची लाट आल्यानंतर यामध्ये नऊ वर्षांची मुलगी श्रुती व सहा वर्षांचा मुलगा श्रेयस हा वाहून जात असताना शशिकांत हे देखील त्यांना वाचवण्यासाठी गेले असताना ते ही समुद्रात बुडाल्याचे सांगण्यात आले. त्यांना वाचवण्यासाठी तेथील स्थानिक पथकामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त सांगण्यात आले आहे. (Sangli family fell into the sea at Salalah Al Mughsail beach in Oman)

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा कुटुंबाकडून करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Municipal Election 2026 : नागपूरमध्ये 'या' प्रभागात चुरशीची लढत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी वर्चस्वाची लढाई

ZP Election Date 2026 : जिल्हा परिषद निवडणुका मार्च-एप्रिलपर्यंत लांबणार नाही; 'थेट तारीख' निश्चित झाल्याने राजकीय रणधुमाळीला वेग!

iPhone Security Alert: ‘आयफोन’ वापरत असाल तर आताच करा ‘हे’ काम, अन्यथा तुमचा फोन होणार हॅक!

AAP Pune Manifesto : पुणे पालिकेसाठी 'आप'चा जाहीरनामा प्रसिद्ध; महिलांना मोफत बस प्रवास आणि 'मोहल्ला क्लिनिक'चे आश्वासन!

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेत प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘रिलॅक्स झोन’ची सुरूवात

SCROLL FOR NEXT