anudan.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्हा नियोजन खर्चाला लागली कात्री " किती ते वाचा?' 

सकाळवृत्तसेवा

सांगली, ः कोरोना महामारीमुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. ती सावरण्याच्या दृष्टीने शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या खर्चाला कात्री लावली. राज्य सरकारने 67 टक्केच निधी खर्च करण्याचे निर्बंध घातले आहेत. केवळ 33 टक्के निधीवर कारभार चालवायचा आहे. यामुळे फेब्रुवारीमध्ये नियोजित आराखड्यात 230 कोटीचा होता. त्यात वाढीव मागणी पैकी 55 कोटी रुपये निधी वाढवून मिळाला. 285 कोटीपैकी केवळ 94 कोटी रुपये निधी सांगली जिल्ह्यासाठी मिळणार आहे.

यामध्ये प्राधान्याने कोरोना विरोधात लढ्यासाठी तरतुद आहे. त्यासाठी 25 कोटीहून अधिक निधीची लागेल. याचा अर्थ 60 कोटीवरच जिल्ह्याला समाधान मानावे लागेल. त्यातही विकास कामांऐवजी नियमित बाबींवर ही रक्कम खर्च होईल. 

देशात आणि राज्यात कोरोनाने थैमान घातले. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनस्तरावर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. टाळेबंदीमुळे राज्याची अर्थव्यवस्था पुरती कोलमडली. ती सावरण्यासाठी 22 मेपासून लॉकडाउनमध्ये काहीशी सवलत देण्यात आली. त्यामुळे काही उद्योग व व्यवसाय सुरू करण्यात आले. मात्र, इतर खर्चावर शासनाने काही निर्बंध घातले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या एकूण खर्चापैकी 67 टक्के खर्चाला कात्री लावण्यात आली. झेडपीलाही त्यांचा सामना करावा लागतोय.

जिल्हा नियोजन समितीच्या 285 कोटी खर्चापैकी 33 टक्केच निधी खर्च करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. त्यामुळे अवघा 94 कोटी निधी नियोजन समितीला मिळणार आहे. 

कोरोनासाठी जिल्हा नियोजनमधून आतापर्यंत मास्क, हातमोजे, हायपोक्‍लॉराईड आदी उपाययोजनांसह जिल्हा रुग्णालयात आपत्कालीन औषधे, वैद्यकीय साधनसामग्री खरेदी, इमारत दुरुस्ती आणि अन्य कोरोना कारणांसाठी खर्च करण्यात आला आहे. मिरज येथील कोवीड रुग्णालय कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू झाली आहे. त्यासाठीही निधी खर्च झाला आहे. येत्या काळात आणखी निधी खर्च करावा लागणार आहे. 
 

योजना प्रकार, मुळ अनुदान ( कोटीत), 
सर्वसाधारण, 285.83 
अनुसुचित जाती उपयोजना, 83.81 
आदिवासी उपयोजना, 00.98 
........................ 
एकूण, 365.82 
................. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara fraud Case: तमिळनाडूच्या महिलेची साताऱ्यात फसवणूक; १२ लाख अन् सात ताेळे साेने, परस्‍पर विक्री, विश्वास नडला, नेमकं काय घडलं!

Paithan News: जायकवाडी धरणाचा वीजपुरवठा अखेर पूर्ववत ; नाथसागर धरण अंधारात

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; इराणवरील हल्ले १० दिवसांसाठी थांबवले, मध्यपूर्वेतील तणाव होणार कमी?

मोठी बातमी! जमिनीच्या प्रत्येक पोटहिश्श्याची मोजणी आता 200 रुपयांत होणार; महसूल विभागाचा निर्णय, 7/12 उताऱ्यावरील सर्वांच्या संमतीची अट, वाचा...

आजचे राशिभविष्य - 27 मार्च 2026

SCROLL FOR NEXT