Sangli district tops in CCTNS investigation system 
पश्चिम महाराष्ट्र

'सीसीटीएनएस' तपास प्रणालीत सांगली जिल्हा राज्यात अव्वल 

शैलेश पेटकर

सांगली : सीसीटीएनस (क्राईम ऍण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम) अर्थात गुन्हे आणि गुन्हेगार तपास जाळे प्रणालीच्या राज्यस्तरीय कामकाजात सांगली जिल्हा पोलिस दलाने राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे. जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या आढाव्यामध्ये दैनंदिन प्रभावी वापर, अचूकता आणि नागरिकांच्या ई-तक्रारींची पूर्तता यामुळे 100 टक्के गुण जिल्हा पोलिस दलाला मिळाले आहेत.
 
राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये "सीसीटीएनएस' प्रणाली कार्यरत करण्यात आली आहे. नागरिकांना कोणताही त्रास न होता सर्व पोलिस ठाण्याचे कामकाज आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करत ऑनलाइन कामावर भर दिला जात आहे. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या होत्या. कच्ची नोंद पद्धत बंद करून ऑनलाइन तक्रारी नोंद करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार सर्व पोलिस ठाण्यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदविली आहे. तंत्रज्ञानावर आधारित कामकाजात पोलिसिंग कामात सातत्य ठेवल्यानेच प्रथम क्रमांक मिळविला आहे. 

कोरोनाचा कहर लक्षात घेता, पोलिस दलही कोरोना नियंत्रणासाठी व्यस्त आहे. अशा परिस्थितीतही सीसीटीएनएस प्रणालीचा योग्य वापर करण्यात आला आहे. या प्रणालीच्या कामकाजाच्या नोडल अधिकारी मनीषा दुबुले यांनी नियमित आढावा घेतल्याने प्रभावी काम झाले आहे. राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल कक्षाचे निरीक्षक अजित दळवी, नितीन बराले, कावेरी हावगोंडी, तेजश्री पाटील, सिटीनझन पोर्टलच्या निरीक्षक विशाखा पाटील आणि या प्रणालीच्या कामकाजात सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अधीक्षक शर्मा, अप्पर अधीक्षक दुबुले यांनी अभिनंदन केले आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

Latest Marathi News Live Update : हनी सिंगला गाणं गायला विरोध, चंदीगड मधून पुणे पोलिसांना पत्र

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

रणबीर कपूरच्या 'रामायण' चा टीझर रिलीज; श्रीरामांच्या भूमिकेत अभिनेता शोभतोय का? प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय? वाचून आश्चर्य वाटेल

SCROLL FOR NEXT