jayant patil Esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli ED action : जयंत पाटील यांचा संबंध नाही, ED प्रकरणी बॅकेचे स्पष्टीकरण

सांगलीमध्ये असलेल्या व्यापाऱ्यांवर जी कारवाई सुरू आहे, त्यांची खाती ज्या बँकेत आहेत त्याची माहिती घेतली जात आहे.

धर्मवीर पाटील : सकाळ वृत्तसेवा

Sangli ED action - इस्लामपूर (जिल्हा सांगली) ईडीची कारवाई आणि राजारामबापू बँक यांचा एकमेकांशी कसलाही संबंध नाही. सांगलीमधील व्यापाऱ्यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईचा भाग म्हणून त्या व्यापाऱ्यांची ज्या-ज्या बँकांमध्ये खाती आहेत, अशा सर्व बँकांमध्ये ईडीने जाऊन चौकशी केली आहे. राजारामबापू बँकेत ते त्यासाठीच आले असल्याचा खुलासा बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

बँकेचे व्यवस्थापक आर. ए. पाटील, कार्यकारी संचालक आर. एस. जाखले, माजी संचालक बाबुराव हुबाले, संजय पाटील, अशोकराव पाटील, अनिल गायकवाड प्रमुख उपस्थित होते. प्रा. शामराव पाटील म्हणाले, शुक्रवारी ११ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगली येथील राजवाडा शाखेत भेट दिली. त्यानंतर ते मुख्य शाखेत आले.

सांगलीमध्ये असलेल्या व्यापाऱ्यांवर जी कारवाई सुरू आहे, त्यांची खाती ज्या बँकेत आहेत त्याची माहिती घेतली जात आहे. संबंधित व्यापाऱ्यांच्या पूर्वीही तक्रारी होत्या. त्याचाच भाग म्हणून हे या तपासासाठी आले होते. याव्यतिरिक्त त्यांनी कोणतीही माहिती मागितलेली नसताना माध्यमांमधून कपोलकल्पित बातम्या दिल्या जात आहेत.

आमदार जयंत पाटील यांना त्यामध्ये गोवले जात आहे. आमदार पाटील यांचा बँकेत कसलाही हस्तक्षेप नसतो. या कारवाईशी त्यांचा संबंध कसलाही नाही. त्यांचे घेऊन त्यांना व बँकेला बदनाम करण्याची बाब निषेधार्ह आहे."

ते म्हणाले, "रिझर्व बँकेकडून आमच्या शेड्युल बँकेची सातत्याने तपासणी सुरू असते. काही त्रुटी आढळल्यास तत्काळ कारवाई होते. रिझर्व बँकेचे नियंत्रण असल्याने इकडेतिकडे सरकायला कसलाही वाव नाही.

आतापर्यंत राजारामबापू बँकेत कुठलीही अनियमितता आढळलेली नाही. निर्लेखित असलेली खाती, तसेच एकरकमी कर्ज परतफेड योजना व एनपीएची खाती यासंदर्भात मागितली गेलेली सर्व माहिती आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांना पुरवलेली आहे. त्यांना कोणताही गैरप्रकार आढळलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शंभरदा फोन केला, पाणी मिळेना, रस्त्यात खड्डे; स्टेजवरच बीडच्या खासदारांना तरुणाचा सवाल, माइक हिसकावल्यानं गोंधळ

Vaibhav Sooryavanshi Wicket : कर्णधार म्हणून वैभव सूर्यवंशीने पदार्पणात किती धावा केल्या? बघा कसा सहज OUT झाला, Video Viral

Sheikh Hasina: शेख हसीना बांगलादेशात माघारी जाण्याच्या तयारीत; भारताने ठेवल्या 'या' दोन दोन अटी

Parbhani: अडीच वर्षे हरवलेल्या महिलेचा AI ने शोधला पत्ता! ChatGPT आणि Google च्या मदतीने परभणीतील कुटुंबाशी पुनर्भेट

बेजबाबदारपणाची पण हद्द असते! बोगद्यात गाडी थांबवून फोडले फटाके; Video Viral

SCROLL FOR NEXT