election seven market
election seven market  sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : सात बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा

सांगली : राज्यात ३१ मार्च २०२२ अखेरच्या निवडणुकीस पात्र असणाऱ्या सुमारे नव्वद टक्के विकास सोसायट्यांच्या निवडणुका सुरू असून, काही पूर्णही झाल्या आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदार असलेल्या या सोसायट्यांमुळे स्थगित करण्यात आलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसह तासगाव, पलूस, विटा, इस्लामपूर शिराळा, आटपाडी सात बाजार समित्यांवर सध्या प्रशासक आहे. या बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम जूनच्या मध्यास सुरू होण्याची शक्यता आहे.

प्राथमिक मतदार याद्यांचा कार्यक्रम १५ जूनपासून अर्हता दिनांक निश्चित करून सुरू होण्याची अपेक्षा असून, जवळपास ३०७ पैकी २५८ बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल ऐन पावसाळ्यात किंवा दिवाळीनंतर वाजण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. सध्याच्या हालचाली पाहता लवकरच निवडणुका शक्य असल्याचे चित्र आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १८ नोव्हेंबर २०२१ रोजी दिलेल्या आदेशात बाजार समित्यांसाठी मतदार असलेल्या विकास सोसायट्यांच्या निवडणुका प्राधान्याने घ्या, असे म्हटले होते. त्यानुसार राज्यात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात ३१ मार्च २०२२ अखेरीस निवडणुकीस पात्र असणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुरवात झाली आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसह तासगाव, पलूस, विटा, इस्लामपूर शिराळा, आटपाडी सात बाजार समित्यांवर सध्या प्रशासक आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका जवळपास दीड वर्ष लांबणीवर टाकल्या होत्या. राज्यातील सर्वच बाजार समित्यांवर २२ एप्रिलनंतर दुसऱ्यांदा प्रशासक नेमला आहे. कोरोनाची लाट कमी झाल्यानंतर शासनाने सर्वच निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांना दिलेली स्थगिती उठवून निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. निवडणूकानंतरच राज्यातील २५८ बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT