facebook app esakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीकर सोशल मिडीयावर अ‍ॅक्टीव्ह ; 'इन्स्टा’ वर दीड लाख युजर्स

इन्स्टा’ने गाठला दीड लाखाचा टप्पा समाज माध्यमांचा वापर झपाट्याने वाढला

अजित झळके - सकाळ वृत्तसेवा

सांगली : एकविसाव्या शतकाचा नवा चेहरा बनलेल्या समाज माध्यमांनी झपाट्याने जाळे विणले आहे. त्यात सर्वांत प्रभावी ठरलेल्या फेसबुकवर जिल्ह्यातील वापरकर्त्यांची (युजर्स) संख्या आता सहा लाखांचा टप्पा पार करून पुढे गेली आहे. आपल्या प्रोफाईलमध्ये ‘शहर- सांगली’, ‘जिल्हा- सांगली’ अशा स्वरूपाचा उल्लेख केलेल्या वापरकर्त्यांची ही संख्या आहे. फेसबुकच्या तुलनेत गेल्या एक-दीड वर्षात प्रभाव वाढत असलेल्या ‘इन्स्टाग्राम’वरील वापरकर्ते आता दीड लाखांवर पोचले आहेत.

राजकारण, व्यापार, उद्योग, शिक्षण, मार्केटिंग, इमेज बिल्डिंग, शेती, गुंतवणूक, रेसिपीसह बहुतांश क्षेत्रांवर या माध्यमांतून प्रभाव टाकला जात आहे. अभ्यासकांच्या मतानुसार, विविध क्षेत्रांतून लोकांसमोर आपले उत्पादन किंवा स्वतःला सादर करण्यासाठी या माध्यमचा उपयोग होतोय. दुसऱ्या बाजूला त्याआधारे खरेदी-विक्री किंवा त्यावर विश्‍वास ठेवून निर्णय घेण्याचे प्रमाण आजही नगण्य आहे. मित्र जोडणे, आपले जगणे-विचार ‘शेअर’ करणे आणि आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग अशा स्वरूपाचा वापर सर्वाधिक आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ३० लाखांवर आहे. त्या तुलनेत वापरकर्त्यांची संख्या २० टक्के इतकी आहे. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत वापरकर्ते १८ टक्के इतके आहेत. देशाच्या सरासरीपेक्षा जिल्ह्याची संख्या दोन टक्‍क्यांनी अधिक आहे.

फेसबुकच्या तुलनेत इन्स्टाग्रामचा प्रभाव वाढतो आहे. युवा वर्गाचा कल झपाट्याने बदलल्याचे हे लक्षण आहे. ‘इन्स्टा’वर रिल्सच्या माध्यमातून स्वतःचे वेगळे विश्‍व निर्माण करण्याच्या धुंदीत हा वर्ग आहे. करिअरच्या दृष्टीने हा फार लांब पल्ल्याचा प्रवास नसला, तरी त्यातून मिळालेली प्रसिद्धी आर्थिक गोष्टींत बदलण्याचे काही मार्ग खुले झाले आहेत, हे मात्र नक्की.’’

- दिनेश कुडचे, सोशल मीडिया अभ्यासक

नव्या रोजगार संधी

सांगली तुलनेत छोटे आहे. मात्र, समाज माध्यमांवर इथल्या बहुतांश क्षेत्रांचा प्रभाव आहे. तो वाढता राहावा, यासाठीची रोजगार निर्मितीही होत आहे. त्यातून तरुणांच्या हातांना काम मिळाले आहेच, शिवाय रोजगाराच्या नवसंकल्पनाही रुजत आहेत. राजकीय पक्षांचे सोशल मीडिया हँडलर सोशल मीडियासाठी पेज डिझाईनर कल्पना प्रभावी ठरवून जाहिरातीद्वारे उत्पन्न.

कुठला वर्ग कुठे जास्त

(समाज माध्यम अभ्यासकांच्या निरीक्षणातून)

१५ ते ३५ वयोगट

इन्स्टाग्रामला अधिक पसंती

रिल्सवर व्हिडिओ निर्मिती, इमेज बिल्डिंगला प्राधान्य

स्टार्टअप, शेअर मार्केटबाबत शोध अधिक

३५ ते ५० वयोगट

फेसबुकला पसंती अधिक

नवी माहिती मिळविण्यावर भर

कौटुंबिक फोटोचे शेअरिंग

अनुभव कथन आणि वाचनाला प्राधान्य

‘टिकटॉक’ स्टार्स

‘टिकटॉक’ हे चीनचे ॲप भारतात प्रचंड प्रसिद्धीस पावले होते. मध्यंतरी त्यावर बंदी आली, त्याआधी हजारो नवख्या कलाकारांनी त्यावर आपली छाप उमटवली आणि ते ‘टिकटॉक स्टार’ झाले. आता ‘रिल्स’, ‘मौज’च्या माध्यमातून लोकांसमोर येतात. काहींनी काही लाख रुपये गुंतवणूक करून व्हिडिओग्राफीची स्वतःची यंत्रणा तयार केली आहे. ज्यांना त्यातील ज्ञान नाही, त्यांच्यासाठी व्यावसायिक छायाचित्रकार आणि व्हिडिओ एडिटर यांची फौज तयार आहे. हा स्वतंत्र व्यवसाय बनला आहे. सांगली शहरात कृष्णा नदीकाठ, आयुक्त बंगला परिसर, ८० फुटी रस्ता हे व्हिडिओ निर्मितीचे केंद्र बनले आहेत. दंडोबाचा डोंगर, खंडेराजुरीचे पठारही आता केंद्रस्थानी येताना दिसत आहे.

इन्स्टावर हे भारी

स्मृती मानधना- ४.८ दशलक्ष फॉलोअर्स

सई ताह्मणकर- १.३ दशलक्ष फॉलोअर्स

जयंत पाटील- २.८४ लाख फॉलोअर्स

रोहित पाटील- ७७ हजार फॉलोअर्स

फेसबुक वापरकर्त्यांत

जगात भारत नंबर एकवर

भारत- २५ कोटी ५१ लाख

युनायटेड स्टेट्स- २४ कोटी

ब्राझील- १३ कोटी ९० लाख

इंडोनेशिया- १३ कोटी ६९ लाख

मेक्सिको- ७ कोटी ८० लाख

फिलिपीन्स- ७ कोटी १७ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लक्ष्मीकांत बेर्डेंनी गाजवलेलं नाटक परत येणार; 'अबब विठोबा बोलू लागला’ मध्ये हास्यजत्रेतील अभिनेता साकारणार धम्माल पुजारी

Building Collapsed: मोठी घटना! तीन मजली घराचा भाग कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू, ११ कामगार ढिगाऱ्याखाली दबले

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update: लासलगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची आवक

SCROLL FOR NEXT