सर्वोत्तोपरी पीक पेरा करण्यासाठी जनजागृती सुरु आहे.  sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : पीक नोंदी करायच्या तरी कशा?

शेतकरी उदासीन; शासनाकडून सक्तीमुळे प्रशासनाची होतेय दमछाक

सकाळ वृत्तसेवा

लेंगरे: शासनाने सुरु केलेल्या ‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोदविंणार माझा पीक पेरा’ या अभिनव उपक्रमाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. मात्र, शासनाकडून शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदविला पाहिजे, असे सक्तीचे केल्याने महसूल विभागाची दमछाक उडाली आहे. एकीकडून शासनाची सक्ती दुसरीकडे शेतकऱ्यांची उदासीनता यामुळे प्रशासन प्रमुख तहसीलदार, तलाठी, कोतवाल यांची कोंडी झाली आहे. मुदतवाढ देऊनही पीक पेरा नोंदी होत नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक प्रशासनाला धारेवर धरत पीक पेरा नोंदीच्या वाढवा अशा सक्त सूचना दिल्याने स्थानिक प्रशासन चांगलेच कामाला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार गावपातळीवर सर्वोत्तोपरी पीक पेरा करण्यासाठी जनजागृती सुरु आहे. सकाळपासून तलाठी, कोतवाल, आशा वर्कर हे शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन पीक नोंदी करा अन्यथा सातबारा कोरा राहिल असे सांगताना दिसत आहे. मात्र, शेतकऱ्यांचे या योजनेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पीक नोंदी कशा करायच्या ? असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

यासंदर्भात तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी सर्व तलाठी व कृषी सहायकांची बैठक घेत रब्बी हंगामातील पीक पाहणी काम सर्वात कमी आहे. जिल्हास्तरावरावरुन तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबतची लवकरच तपासणी होणार आहे तरी येत्या दोन दिवसात आपल्या कडील प्रलंबित रब्बी हंगामाची पीक पाहणी संबंधित शेतकऱ्यांच्या मदतीने तातडीने करावी. पिक नोंदणी कामकाजात प्रगती करावी, यासाठी सर्व तलाठी कोतवाल, ऑपरेटर, महा-ई-सेवा केंद्र ऑपरेटर, कृषी सेवा केंद्र, आत्मा ऑपरेटर यांची मदत घेवून, आपले कौशल्य वापरून १५ मार्च पर्यंत सर्व काम पूर्ण करावे असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT