Sangli Friendship Hands Of Help Forward : Sangli Marathi News 
पश्चिम महाराष्ट्र

'ती सध्या काय करते...'  म्हणत ते धावले मदतीला 

रवींद्र मोहिते

वांगी (सांगली) : मैत्रीची व्याख्या वॉटस्‌अप चाटिंग, शेअरिंग आणि लाईकच्या कुंपणात बंदिस्त झाल्यासारखे वाटत असताना काही लोकांनी मात्र जुन्या आठवणींचे धागे काही ना काही निमित्ताने घट्ट करण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. असाच एक प्रयत्न वांगी (ता. कडेगाव) येथे झाला. सन 1994 मध्ये दहावीत शिकणारी "ती सध्या काय करते', या प्रश्‍नाच्या उत्तरात तिची आर्थिक समस्या दडली होती. त्या समस्येला भिडताना तिच्यासोबत त्याकाळी शिकणाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला आणि चक्क तिच्या मुलीच्या लग्नासाठीचा संपूर्ण संसार सेट त्यांनीच खरेदी करून दिला. 

जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

वांगी (ता. कडेगाव) न्यू इंग्लिश स्कूलच्या 1994 च्या बॅचमधील शालेय सवंगड्यानी हा आदर्श घालून दिला. पितृछत्र हरपलेल्या मुलीच्या पाठीशी खंबीर माणसे उभी राहिली आणि तिची आई भारावून गेली. या कुटुंबीयांसह उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. शालेय शिक्षण पूर्ण करून सारेच जीवनात स्थिर झालेत. व्यापात बुडालेत, मात्र शाळेच्या आठवणी जाग्या होतात तेव्हा सारे मागे सोडून एक पाऊल पुढे पडते. त्यातूनच स्नेहमेळावा ठरला. 1994-95 च्या दहावी बॅचने आयोजित केला. इतक्‍या वर्षांनंतर एकमेकांना भेटल्या नंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यात कोण काय करते, यावर चर्चा झाली. 

वर्गातील एक सहकारी मुलीवर सध्या आभाळ कोसळले असल्याची बातमी त्यातूनच पुढे आली. लहानपणीच पित्याचे छत्र हरवलेली मुलगी मामाच्या घरी मोठी झाली. तिचा विवाह संपन्न झाला. मात्र नियतीने तिच्यावर आघात केला. तिच्या मुलीच्या लग्नासाठी आता आर्थिक अडचण आहे, ही माहिती पुढे आली. तेव्हा या सर्वांनी मदत म्हणून तीस हजार रुपये जमा केले. सर्व संसारसेट भेट स्वरूपात दिला. 

या मित्रांची एकी 

ऍड. महेंद्र देशमुख, प्रकाश सूर्यवंशी, राहुल साळुंखे, सतीश सूर्यवंशी, अधिक कांबळे, नारायण चव्हाण, सचिन शिर्के, प्रवीण सूर्यवंशी, अर्जुन कुंभार, अनिल जठार, बापूसाहेब मोकळे, कृष्णत मोकळे, सुरेश सूर्यवंशी, विकास शंकर सूर्यवंशी, उमेश कुलकर्णी, संदीप रास्कर, संतोष पवार, किरण सूर्यवंशी, शैलेंद्र क्षीरसागर, सुरेश चव्हाण, सुजाता माळी, आशारणी मोहिते, मनीषा मोहिते, शाहीन शिकलगार, सुरेखा मोहिते, वैशाली वाघमोडे, सुषमा दाईगडे, मनीषा चव्हाण, रेखा होनमाने, आशाराणी सरोदे, वंदना पवार.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT