sangli gagane family dog marriage 
पश्चिम महाराष्ट्र

टायगर आणि डॉलीच्या वरातीत नाचले गाव: सांगलीत लग्नाची चर्चा

सकाळ वृत्तसेवा

सांगली : आजच्या जमान्यात कोण कशाची हाऊस करतात हे सांगता येत नाही. माणसां प्रमाणेच जनावरांच्यावर जीवापाड प्रेम करणारी अनेक अवलिया आज समाजात आहेत. सांगली येथील गगने कुटुंबीयांनी आपल्या कुत्र्यावर जीवापाड प्रेम करताना त्याचा विवाह मोठ्या जल्लोषात साजरा केला. हा विवाह सध्या चर्चेचा ठरला आहे. विशेष म्हणजे या विवाहासाठी मित्रमंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सांगली संजयनगर येथे अक्काताई गगणे कुटुंबांनी आपल्या कुत्रा-कुत्री वर मोठे प्रेम आहे.  त्यांनी साखरपुडा सह थाटामाटात या दोघांचे लग्न लावून दिले आणि त्याच्यातील प्राण्यावरील प्रेमाचे दर्शन घडवले.या विवाहसोहळ्यात  चिरंजीव टायगर आणि वधू चि.सौ.का. डॉली होती. त्यांच्या कुटुंबांनी  या दोघांचा साखरपुडाही थाटात केला होता. त्यानंतर प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी तर गावात आनंदाला उधाणच आलं होतं.

फुलांनी सजवलेल्या कारमधून डॉलीला टायगरच्या घरी नेण्यात आलं.  वधूच्या कुटुंबीयांनी वरपक्षाचं भव्य आणि दिव्य पद्धतीने स्वागत केले. नववधू प्रमाणेच डॉलीला लाल रंगाची साडी नेसवण्यात आली होती. तर वर टायगर रुबाबदार दिसत होता. 


 मोजके विधी केल्यानंतर या दोघांना हार घातले आणि विवाह संपन्न झाला. त्यानंतर बँडबाजाच्या तालावर टायगर डॉलीची वरात निघाली.या वरातीत गावकरी संगीताच्या तालावर नाचत होते. यावेळी मंडपात जेवणाची जोरदार तयारी सुरू होती. अनेकांनी या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन स्नेहभोजनाचा ही आनंद घेतला. प्राण्यावरील प्रेमाचे हे अनोखे दर्शन एका वेगळ्या थाटामाटाने पहावयास मिळाले.

संपादन-अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT