Post-Graduate sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली: ‘वालचंद अभियांत्रिकी’चे मंगळवारी पदवीदान

डॉ. रघुनाथ माशेलकर, कुलगुरू डी. टी. शिर्के प्रमुख पाहुणे

सकाळ वृत्तसेवा

सांगली: वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दहावा पदवीदान समारंभ येत्या मंगळवारी (ता. १७) होणार आहे. २०१९-२०२० आणि २०२०-२०२१ या दोन्ही शैक्षणिक वर्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात येईल. कोरोना महामारीमुळे मागील वर्षी हा समारंभ न झाल्याने या दोन्ही वर्षांतील उत्तीर्णांचा एकत्रित असा हा कार्यक्रम होत आहे. यावेळचा हा समारंभ ऑनलाईन स्वरूपातील ‘ऑगमेंटेड रिॲलिटी’ या तंत्राद्वारे होणार आहे.

या सोहळ्यात प्रमुख पाहुणे पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आहेत. यावेळी सांगलीतून महाविद्यालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहातून प्रमुख ४८ यशवंतांचा सत्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के करतील. खासदार संजय पाटील, प्रशासकीय कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष अजित गुलाबचंद, महाविद्यालयाचे संचालक डॉ. पी. एच. सावंत यांचेही यावेळी मार्गदर्शन होणार आहे. एकूण १३५५ विद्यार्थी पदवी घेतील. त्यांच्यासह जगभरातील ‘वॉलचंदियन्स’ हा कार्यक्रम पाहतील. यानिमित्ताने महाविद्यालयातील परीक्षा विभागातील अत्याधुनिक सुविधांचे उद्‌घाटन कुलगुरूंच्या हस्ते होईल.

डॉ. प्रशांत खरात व प्रा. अनिल सुर्वे या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक आहेत. हा कार्यक्रमासाठीची लिंक महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर (www.walchandsangli.ac.in ) उपलब्ध असेल. यंदाचे वर्ष महाविद्यालयाचे अमृतमहोत्सवी म्हणून साजरे होत असून, त्यानिमित्ताने वर्षभर विविध उपक्रम होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

SCROLL FOR NEXT