यात्रा, उरुसांमध्ये घुमू लागला ‘सर्जा-राजा’चा आवाज sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली ; ‘खिलार’ जातीच्या पैदासीला सुगीचे दिवस

बैलगाडीवानांमध्ये उत्साह; यात्रा, उरुसांमध्ये घुमू लागला ‘सर्जा-राजा’चा आवाज

अनिल पाटील : सकाळ वृत्तसेवा

सलगरे: न्यायालयाकडून बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाल्यावर ‘खिलार’ जातीच्या पैदासीला ‘अच्छे दिन’ आले असून, यात्रा, उरुसांमध्ये ‘सर्जा-राजा’चा आवाज आता पुन्हा घुमू लागला आहे. शर्यतीच्या बैलगाडीवानांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.बैलगाडी शर्यतींना बंदी घातल्यावर खिलार जनावरांचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना खिलार जातीच्या गायी आणि खोडांचा सांभाळ करून त्यांना जतन करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. देशी गायींना आणि वासरांचा सांभाळ करणारा शेतकरी कोणताही मोबदला न घेता फुकटात दुसऱ्याला सांभाळ करण्यास देत असायचा. त्यांचा सांभाळ करीत असताना एकप्रकारे आर्थिक ताण शेतकऱ्यांवर पडत होता आणि खिलार पैदासीवर परिणाम झाला होता.

मिरज पूर्व भागासह इतर भागातील अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालविणारी बैलगाडी शर्यत सुरू झाल्याने बैलगाडीवान आणि देशी खिलार गायींचे व खोडांचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता ‘अच्छे दिन’ आले आहेत. दुस्सा बिनदाती खोंडाला आता ८० ते ९० हजार रुपयांपर्यंत मागणी होत आहे. तीन दाती दुस्सा खोडांना तर एक लाखापासून चार लाखांपर्यंत मागणी होत आहे. त्यामुळे खिलार खोडांचे संगोपन करणारा शेतकरी उत्साहाने पुन्हा जोमाने खिलार जातीच्या जनावरांचे संगोपन करताना दिसत आहे. तसेच ग्रामीण, शहरी भागातील यात्रा, उरुसामध्येही भव्य बैलगाडी शर्यतींचे आयोजन करून बैलगाडीवानांच्या ‘सर्जा-राजां’चा आवाज घुमू लागला आहे. मिरज पूर्व भागातील सलगरे, बेळंकी, डोंगरवाडी, कोंगनोळी, कुकटोळी जानराववाडी तसेच कर्नाटकातील खेडेगावात मोठ्या प्रमाणात खिलार जातीचे संगोपन केले जात आहे. या परिसरात सध्या बैलगाडी शर्यतीसाठी खिलार जातीच्या खोडांची खरेदी करण्यासाठी मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, बेळगाव येथील ग्राहकांची गर्दी होत आहे.

बैलगाडी शर्यतीवर बंदीमुळे बैलगाडीवानांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. पण, न्यायालयाने शर्यतीवरील बंदी उठविल्यावर काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवनमान पुन्हा सुधारेल.

- भय्या गायकवाड, शेतकरी, बेळंकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

Pune Flood Alert: पुण्यात धोक्याची घंटा! एकतानगरमध्ये ४० कुटुंबांतील १०० नागरिक स्थलांतरित; मुठा नदीतील पातळीत वाढ झाल्याने पाणी घुसले

Asmita Dey won historic Gold : अस्मिता डे हिने 'Golden Score'वर जिंकले सुवर्ण! राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोपटूने इतिहास घडवला, पहिली भारतीय

India Probable Squad 2027 ODI World Cup : विराट कोहली, रोहित शर्मासह ६ खेळाडूंची जागा पक्की! २०२७च्या वन डे वर्ल्ड कपसाठी कशी असेल टीम इंडिया?

Parli Vaijnath: परळीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे साकडे; सुनेत्रा पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद

SCROLL FOR NEXT