सर्वसामान्यांना महागाईचे चटके sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : सर्वसामान्यांना महागाईचे चटके

सर्वच किराणा मालाच्या किमतीत वाढ

सकाळ वृत्तसेवा

बोरगाव : दिवाळीच्या तोंडावर तेल, तूप, साखरेसह जवळपास सर्वच किराणा मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. यामुळे या वर्षीची दिवाळी नागरिकांसाठी महागाईची ठरणार आहे.

दिवाळीची चाहूल लागताच खाद्यतेलांसह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत अचानक वाढ झाली आहे. विशेषतः सनफ्लॉवर आणि सोयाबीन तेलाच्या दरामध्ये झालेली वाढ सामान्यांचे बजेट बिघडविणारी आहे. आठवडाभरातील ही वाढ विक्रेत्यांनाही आश्चर्याचा धक्का देणारी ठरत आहे. सनफ्लॉवर आणि सोयाबीन तेलाचा खाण्यात उपयोग करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दिवाळीच्या तोंडावर मागणी वाढल्याने सोमवारी तेलाच्या किमतीत प्रति लिटर ५ रुपयांनी वाढ झाली आहे.

साखरेच्या भावातही वाढ झाली असून, साखर दोन महिन्यांपूर्वी ३६०० रुपये क्विंटल होती, ती आज ३९०० रुपयांवर पोहचली आहे. जिल्ह्यात या वर्षी कोरोना, अतिवृष्टी, वाढलेले इंधनाचे दर यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक हैराण झालेला असतानाच दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची होरपळ होत आहे.

भाजीपाल्यापासून धान्यापर्यंतचे भाव वाढले आहेत. घरात या गोष्टी आवश्यक आहेत; मात्र त्या आणताना मोठी अडचण भासत आहे. रोजगाराचेही संकट कायम आहे. संसाराचा गाडा चालवायचा कसा?

- कल्पना साळुंखे, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT