दक्षिण भारत जैन सभेच्या यंदाच्या शताब्दी अधिवेशनाचा उद्‍घाटन सोहळा
दक्षिण भारत जैन सभेच्या यंदाच्या शताब्दी अधिवेशनाचा उद्‍घाटन सोहळा sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : जैन सभेच्या शताब्दी अधिवेशनाचे शानदान उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा

सांगली - दक्षिण भारत जैन सभेच्या यंदाच्या शताब्दी अधिवेशनाचा उद्‍घाटन सोहळा शनिवारी सकाळी थाटात संपन्न झाला. नांदणी मठाचे प.पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींच्या पावन सानिध्यात आणि सभा पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‍घाटन झाले.येथील नेमिनाथनगर कल्पद्रुम क्रीडांगणावर भव्य सभा मंडपात जैन सभेचे ऐतिहासिका अधिवेशन दोन दिवस चालणार आहे. रविवारी (ता. १५) मुख्य दिवस आहे. आज उद्‍घाटन आणि शाखा अधिवेशनाची धामधुम सुरु झाली आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात विस्तार असलेल्या सभेच्या या सोहळ्यासाठी हजारो लोक सांगलीत दाखल झाले आहेत. दिवाणबहादूर अण्णासाहेब लठ्ठे नगर असे नाव देण्यात आले असून त्याचे उद्‍घाटन डॉ. भरत लठ्ठे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते धर्म ध्वजवंदन झाले. सहकार महर्षी स्व. शामराव पाटील यड्रावकर शांतिपीठ उद्‍घाटन माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या हस्ते झाले. राज्यमंत्री तथा अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्‍घाटन झाले. श्रावकरत्न रावसाहेब पाटील यांनी अध्यक्ष म्हणून पदग्रहण केले.

आज दिवसभरात जैन महिला परिषद, वीर महिला मंडळ मध्यवर्ती समिती, पदवीर संघना आणि वीर सेवा दन मध्यवर्ती समितीचे अधिवेशन होणार आहे. रविवारी मुख्य सोहळा असून त्याला मुख्यमंत्री उद्‍धव ठाकरे ऑनलाईन संवाद साधतील. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांच्यासह दोन्ही राज्यातील प्रमुख मंत्री उपस्थित राहणार आहेत.

यावेळी चेअरमन रावसाहेब पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष माधव डोर्ले, डॉ. अजित पाटील, सहखजिनदार पा. पा. पाटील, खजिनदार संजय शोटे, अधिवेशनाचे कार्याध्यक्ष सुरेश पाटील, आमदार अभय पाटील, सचिव प्रा. एन. डी. बिरनाळे, खजिनदार सागर वडगावे आदी प्रमुख उपस्थित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT