बंदोबस्त कडक sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : स्मारक परिसरामध्ये कडेकोट बंद

सर्व मार्ग रोकले : बंदोबस्त कडक

सकाळ वृत्तसेवा

कुपवाड: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून महापालिकेतील राष्ट्रवादी - कॉग्रेस विरुद्ध भाजप उफाळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज कडेकोट बंद पुकारण्यात आला आहे.स्मारकाच्या दिशेने जाणारे सर्व मार्ग पोलिसांनी अडथळे उभारून रोकले आहेत.

महापालिका प्रभाग आठ परिसरातील अहिल्यादेवी यांच्या स्मारकाचा सोहळा येत्या 2 एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. त्याबाबतचा कार्यक्रम महापौरांसह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आला असून त्याच्या अगोदरच आज 27 मार्चला बहुजन समाजातील कार्यकर्त्यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन करणार असल्याची घोषणा भाजपने केली आहे. याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका धारण करत आजच्या कार्यपूर्तीसाठी शड्डू ठोकला आहे.

निर्माण झालेली वादाची स्थिती पाहता प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी येणाऱ्या 2 एप्रिल पर्यत स्मारक परिसरातील शंभर मिटर हद्दीत संचारबंदी लागू केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज रविवारी पोलिस बंदोबस्त आणखी कडक करण्यात आला. गर्दी नियंत्रणासाठी राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. स्मारक परिसरात आज सकाळपासूनच पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. सूतगिरणीच्या दिशेने येणारी वाहने रस्त्या मधोमध अडथळा उभारून रोखण्यात आली आहेत. ठिकठिकाणी पोलिसांच्या तुकड्या बंदोबस्त बजावत आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांची अडवणूक करून विचारपूस करण्याचे काम ते करताना ते आढळतात. केवळ पोलिस प्रशासनाची वाहतूक स्मारकस्थळी सुरू ठेवण्यात आली आहे. आजच्या सोहळ्याचा नियोजनाची सुरुवात ठीक चार वाजता सूतगिरणी चौकातून होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Biogas Project : बायोगॅस प्रकल्पासाठी १७० कोटींचा वाढीव खर्च? - ठेकेदाराला दर कमी करण्यासाठी दिले पत्र

Blinkit-Zepto वरून सामान मागवलं... पण मॅन्युफॅक्चरिंग डेटच गायब! आता काय करायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला उपाय

Supreme Court: ''आता ही शेवटची संधी..'' पॅकिंग फूडवरील इशाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालय आक्रमक, सरकारसह FSSAI ला अल्टिमेटम

Snake in Railway : पुणे-दानापूर एक्सप्रेस मध्ये साप; प्रवाशांमध्ये घबराट

Pune News : पथ विभागाच्या कामांची होणार पोलखोल? महापौरांनी मागितला आठ दिवसात अहवाल

SCROLL FOR NEXT