Sangli Kavathe Mahankal Nagar Panchayat Election 2022 esakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली - कवठे महाकांळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीची मुसंडी

राष्ट्रवादीने मुसंडी मारत नगरपंचायतीत एकहाती सत्ता मिळवली आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिरढोण : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल चुरशीने ८०.४० टक्के मतदान झाले. ४ जागांसाठी हे मतदान झाले. १३ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान झाले. ४ प्रभागांसाठीची १८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. दरम्यान, कवठेमंकाळमध्ये राष्ट्रवादीचा दणदणीत विजय झाला आहे. राष्ट्रवादीच्या रोहित पाटलांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा शेतकरी विकास आघाडी ६ आणि एका जागेवर अपक्ष निवडून आले आहेत. यावेळी राष्ट्रवादीने मुसंडी मारत नगरपंचायती एकहाती सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पाटील यांचा विजय झाला आहे. या विजयामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. (Sangli Kavathe Mahankal Nagar Panchayat Election 2022)

दरम्यान, मतदान पारपाडण्यासाठी प्रशासनाने सोय केली होती. पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सकाळपासून सायंकाळपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत झाली सकाळी दहा वाजता मत मोजणी झाली आहे. चार प्रभागांसाठी झालेले मतदान असेः एकूण ३ हजार ७७२. स्त्री (१५०३) व पुरुष (१५३०) असे ३ हजार ३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. टक्केवारी ८०.४० आहे. २१ डिसेंबर रोजी झालेल्या १३ प्रभागांसाठीचे मतदान व आज झालेल्या ४ प्रभागांच्या अशा १७ जागांसाठी बुधवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. शेतकरी विकास आघाडी की राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप, आर.पी.आय. यांची सत्ता येणार हे दुपारी स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार! राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्लॅन ठरला; अमित शाहांनी रवींद्र चव्हाणांना काय सांगितलं?

Solapur Crime: छत्रपती शिवाजी महाराजांचा बेकायदा पुतळा बसवल्याप्रकरणी अंकोलीच्या अकरा जणांवर गुन्हा; शासकीय नियमांचे उल्लंघन!

SCROLL FOR NEXT