Almatti Dam Karnataka esakal
पश्चिम महाराष्ट्र

आलमट्टीतील विसर्ग कायम राहिल्यास सांगली, कोल्हापूर, बेळगावमधील पूरस्थिती कमी होणार; सध्या किती लाख विसर्ग सुरु?

आलमट्टीत महाराष्ट्राच्या विनंतीनुसार आलमट्टीतील विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या आलमट्टीची पातळी ५१३.२६ मीटरवर आहे.

सकाळ डिजिटल टीम

जलाशयात गेल्या तीन दिवसांपासून तीन लाख क्युसेक पाणी विसर्ग करण्यात येत असल्याने पाणीपातळी कमी होत आहे.

चिक्कोडी : पावसाची उघडीप मिळाल्याने शनिवारी आलमट्टी (Almatti Dam) जलाशयात आवक कमी झाली असून विसर्ग कायम आहे. शनिवारी २ लाख ३८ हजार क्युसेक आवक होती तर तीन लाखांचा विसर्ग शनिवारीही कायम ठेवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत आलमट्टीत आवक वाढत गेली आहे. त्यानुसार आलमट्टीच्या विसर्गाकडे सांगली, कोल्हापूर (Sangli, Kolhapur Flood), बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यानुसार आलमट्टीत महाराष्ट्राच्या विनंतीनुसार आलमट्टीतील विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या आलमट्टीची पातळी ५१३.२६ मीटरवर आहे.

जलाशयात गेल्या तीन दिवसांपासून तीन लाख क्युसेक पाणी विसर्ग करण्यात येत असल्याने पाणीपातळी कमी होत आहे. २ लाख ३७ हजार ९६३ क्युसेक आवक असली तरी ती दोन दिवसांच्या तुलनेत जादा आहे. जलाशयात शनिवारी संध्याकाळी ७५ टीएमसी (६१.५९ टक्के) पाणीसाठा झालेला आहे. सध्या सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे पाणी वाहून येण्याचे प्रमाण कमी होणार नाही, तोपर्यंत आलमट्टीतील विसर्ग कायम राहणार आहे.

आलमट्टीतील विसर्ग कायम राहिल्यास सांगली, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातील पूरस्थिती कमी होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यासाठी तीन जिल्ह्यांतील अधिकारी पाणी व पाऊस यांचा अंदाज बांधून समन्वयातून विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे दोन दिवसांत पाणी आवक कमी झाल्यावर आलमट्टीचा विसर्ग कमी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT