Sangli Krishnakathi, water level at 34 feet 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत कृष्णाकाठी महापुराची धास्ती, पाणीपातळी 34 फुटांवर 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः सन 2019 ला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाप्रलयकारी महापूर आला होता. यंदा तो काळ मागे सरला आणि कृष्णाकाठी हायसे झाले.

यंदा महापूर येणार नाही, अशी आशा निर्माण झाली, मात्र पुन्हा सांगलीकरांमध्ये आता धास्ती निर्माण झाली आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढायला लागली आहे. सोमवारी (ता. 17) दुपारी साडेबारा वाजता आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी 34 फुटांवर गेली. ती रात्री उशीरापर्यंत 40 फुटांवर पोहचेल, असा प्राथमिक अंदाज आहे. कृष्णाकाठच्या भागातील घरांतून तातडीने स्थलांतर करण्याची सूचना महापालिकेने केली असून नागरिकांनी साहित्य बांधायला सुरवात केली आहे. 


कोयना धरणातून काल रात्रीपासून 55 हजार क्‍यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तो काल दुपारी 34 हजारांच्या घरात होता. पुढील पाच दिवस कोयना पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सहाजिकच धरणात पाणीसाठा वाढणार आहे.

सोबतच कृष्णा नदीच्या क्षेत्रात पाऊस सुरु झाल्याने नदीत वेगवेगळ्या मार्गातून येणारे पाणी वाढत निघाले आहे. त्याचा वेग रविवारी सायंकाळनंतर वाढला आहे. त्यामुळे सावंत प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, गवळी गल्ली, रामनगर, श्‍यामरावनगर या भागातील नागरिकांमध्ये सध्या भितीचे वातावरण आहे. पाणी पातळी 45 फुटांवर गेल्यास हे भाग पाण्याखाली जातात. त्याआधी काही भागांत पाणी शिरते. आता कर्नाळ रस्त्यावरील पूल शेरीनाल्याच्या पाण्याखाली गेला आहे. सावंत प्लॉटमधील काही पत्र्याचे शेडवजा घरे पाण्यात गेली आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Rahul Gandhi : शरद पवार यांच्यानंतर स्टॅलीन यांनीही राहुल गांधींची साथ सोडली? DMK इंडिया आघाडीच्या बैठकीला राहणार गैरहजर

Solapur DCC Bank Result : पालकमंत्री जयकुमार गोरेंचा मास्टरस्ट्रोक! सोलापूर जिल्हा बँकेत भाजपची एकहाती सत्ता; 19 पैकी 18 जागांवर वर्चस्व, मोहिते-पाटील पॅनेलचा दारुण पराभव

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या भेटीला गौतम अदानी; रुग्णालयात जाऊन घेतली प्रकृतीची विचारपूस

Prithviraj Chavan on Constituency Delimitation : खासदारांची संख्या ५४३ वरून थेट ८५० होणार? काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका; पृथ्वीराज चव्हाण यांचा केंद्र सरकारवर थेट निशाणा

Viral Video: बाल्कनीतून पडलेला कुत्रा विजेच्या खांबावर अडकला; तरुणाने जीवाची पर्वा न करता केली सुटका, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT