sangli sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : महाप्रलयातून धडा शून्य

नदीकाठी मोठी भिंत बांधण्यासह हवेतील प्रस्ताव हवेतच

सकाळ वृत्तसेवा

सांगली : सांगलीच्या इतिहासातील महाप्रलयाला वर्ष झाला. कृष्णा नदीने हाहाकार माजवत सांगलीच्या पेठांसह दीडशेहुन अधिक गावे, वाड्यावस्त्या, काही हजार एकर शेती कवेत घेतली होती. वर्ष पुर्ण होत असताना आपण धडा काय घेतला? याचा शोध घेताना मात्र कागदी घोडे, काही महाकाय योजना आणि वास्तवात भला मोठा शुन्य हाती दिसतो. गतवर्षी याच दिवशी पाणीपातळी ५४.५ फुटांवर होती. वर्षपुर्तीला ही पातळी आठ फुटांवर आहे. ती निसर्गाची कृपा अन्यथा कृष्णाकाठ आजही भितीच्या छायेखालीच आहे.

गतवर्षी कृष्णा-कोयना नद्यांच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात व धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे २००५ मध्ये आलेल्या पुराची पुनरावृत्ती झाली. कृष्णा नदीची पाणी पातळी सकाळी ५४.५ फुटांवर पोहचली होती. आदल्यादिवशी रात्रीत दहा ते बारा फुटांनी पाणी पातळी वाढली होती. सांगली शहरातील मुख्य पेठांसह गावे, शेती पाण्याखाली गेली होती. नागरिकांना स्थलांतर व्हावे लागले. याला आता वर्षपुर्ती झाली आहे. अशातच या महाप्रलयातून धडा काय घेतला, याचा विचार केला असता हाती भोपळा दिसतोय. महापूराचे पाणी रोखण्यासाठी नदीकाठी मोठी भिंत बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याची चर्चा केवळ हवेतच आहे.

दुसऱ्या बाजूला महापूराचे पाणी दुष्काळी भागांना देण्याचा विचार करण्यात आला. असे अशक्यप्राय आणि अव्यवहार्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच महापूरानंतर रेड झोनमधील बांधकामे काढण्यासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने विचार केला. मात्र एकाही बांधकाम काढण्यात आलेले नाही. वर्षपुर्तीनंतर कलं तरी काय, असा जाब सजग सांगलीकरांना विचारण्यास हवा.

इतका मोठा प्रलय आल्यानंतर ही पुरपट्ट्यातील बांधकामाची वाढती संख्या आणि एकीकडे नागरीकांची अपरीहार्ता निर्माण झाली आहे. पुन्हा पूर आला की अन्न वाटप आणि निवाऱ्याचे ठेके तयार होतात. जणू पूर आवडे सर्वांना अशी स्थिती निर्णाम होते. महाप्रलय रोखण्याच्या नियंत्रणात मात्र मोठा दुष्काळ दिसून येतो. १५ जुलै रोजी कृष्णा नदीची पातळी २० फुटांवर होती. त्यावेळी कृष्णाकाठचे लोक धास्तावले होते. आजघडीला नदीची पातळी आठ फुटांवर आहे. ही निसर्गाची कृपाच आणि शासनकर्त्यांची मात्र उदासिनता म्हणावी लागेल.

महापूर नियंत्रणासाठी अनेक योजना आणणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात काहीच झालेले नाही. महापुराच्या एक वर्षानंतरही भोपळाच हाती आहे. पूर पट्ट्यातील बांधकामे अद्याप काढलेली नाहीत. तसेच, नैसर्गिक नाल्यांच्या दिशा वळवल्या आहेत. महापुरात जॅकवेल पाण्याखाली जाते. निदान त्याची उंची वाढवण्याची तसदीही घेतली नाही. प्रशासनास जाब विचारू.

- सतीश साखळकर,नागरिक जागृती मंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT