Sangli Loudspeaker Controversy sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत कमी आवाजात अजान; मनसेचे मारुती मंदिरात हनुमान चालिसा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून यंत्रणा

सकाळ वृत्तसेवा

सांगली - मशिदीवरील भोंग्यांवरून राज्यभर वाद पेटलेला असताना आज सांगलीत पहाटेची अजान भोंग्यावरून देण्यात आली नाही. दुपारी सव्वा एकची अजान अत्यंक मी आवाजात दिली गेली. प्रत्येक मशिदीबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मनसेने मारुती चौकातील मारुती मंदिरात हनुमान चालिसा पठण केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून यंत्रणा, सामाजिक संघटना, धार्मिक संघटना सावध आहेत. भोंग्याचा वाद जातील सलोख्याला बाधा आणणारा ठरू नये, यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरु होते. आज सकाळपासून नेमके काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पहाटे साडेपाच वाजताची अजान भोंग्यावरून देण्यात आली नाही. मुस्लिम समाजाने सर्वोच्च न्यायालयाच्या रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत ध्वनीक्षेपक वापरण्यास बंदीच्या आदेशाचे पालन केले. त्यामुळे कोणताही वाद उद्‍भवला नाही.

शंभर फुटी रस्त्यावरील पाकिजा मशीदसह शहरातील मदीना मशीद, गरीब नवाज मशीद, जामा मशीद, गवळी गल्लीतील मक्का मशीद, कत्तलखाना परिसरात नुरानी मशीद, संजयनगर येथे अक्सा मशीद येथे हळू आवाजात दुपारची अजान झाली. विश्रामबागला वालचंद कॉलेजच्या बाजूला एक मशीद आहे, मात्र तेथे भोंगे नाहीत. तेथे मुस्लिम समाजाची वस्तीच नसल्याने भोंगे नसल्याचे सांगण्यात आले.

मुस्लिम समाजातील तरुण, मशीदचे विश्‍वस्त यांनी दुपारी एकत्र येत कोणत्याही स्थितीत कुणाशीही वाद घालायचा नाही, शांतता राखायची, अशी भूमिका घेतली. पाकिजा मशीदचे विश्‍वस्त निहाल अन्सारी म्हणाले, ‘‘न्यायालय आणि सरकार जो काही आदेश देईल तो आम्हाला शंभर टक्के मान्य आहे. आम्हाला नमाज जितके प्रिय आहे, तितकेच संविधान प्रिय आहे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन आम्ही करणार नाही. उद्या सांगितले लाऊडस्पीकर पूर्ण बंद करा, तर आम्ही त्या आदेशाचे पालन करू.

दरम्यान, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, संदीप टेंगले आदींनी मारुती चौकातील मारुती मंदिरात हनुमान चालिसा पठणे केले. त्यांना पोलिसांनी काल नोटीस बजावली होती. त्यांनीही कायद्याचा सन्मान करत शांततेने आपली प्रतिक्रिया देत हनुमान चालिसाचे पठण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: सौदी अरेबियाने पाइपलाइन बंद केली, कच्च्या तेलात तेजी; गणेश चतुर्थीला पेट्रोल-डिझेल अन् LPG चे दर किती?

Maratha Reservation: मुंबई पोलिसांची परवानगी नाकारली तरी जरांगे जाणारच; ‘आंदोलनस्थळी मरेन, पण सरकारपुढे गुडघे टेकणार नाही’

IND vs AFG: पहिल्या T20I पूर्वी 'जन गण मन'च्या आधी 'वंदे मातरम्' का वाजवलं गेलं? जाणून घ्या ऐतिहासिक घटनेमागचं कारण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

Maharashtra School Recruitment: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! राज्यात २८ हजारांहून अधिक पदे भरण्याचा मार्ग मोकळा, शिक्षकेतर भरतीचे नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT