marcket 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीचे व्यापारी 52 दिवसांत हे विसरले

सकाळवृत्तसेवा

सांगली ः एक-दोन नव्हे तर तब्बल 52 दिवस शटर डाऊन होते... दुकान उघडलेच नाही... खूप प्रयत्न केल्यानंतर अखेर दुकाने सुरु करण्यास आज मान्यता मिळाली. ग्राहक यायला लागले. वस्तू मागायला लागल्या... पण गेल्या 52 दिवसांत अनेक दुकानदारांना आपण कुठली वस्तू कुठे ठेवलीय तीच सापडेना, काहींना तर वस्तूंचे दरही कळेनात... 52 दिवसांत व्यापारी अनेक गोष्टी विसरले.

आता दोन-चार दिवस त्यांना पुन्हा सेट व्हायला लागणारच. 22 मार्चला जनता कर्फ्यू घेतला गेला. त्यानंतर दोन दिवस व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद पुकारला. पुढच्याच दिवशी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सलग 52 दिवसांपासून सांगलीतील दुकाने बंद होती.

व्यापाऱ्यांनी अतिशय काटेकोरपणे नियमांचे पालन केले होते. त्यानंतर मात्र त्यांचा संयम सुटू लागला होता. पंधरा दिवसांपूर्वी शहरातील सिंगल स्टोअर सुरु करण्यास परवानगी देण्यात आली, मात्र सांगली शहरातील प्रमुख पेठा असणाऱ्या गणपती पेठ, सराफ कट्टा, कापडपेठ, हरभट रोड आणि मारुती रोज सुरु करण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी बंडाची तयारी केली. भले गुन्हे दाखल केले तरी चालतील, मात्र आम्ही दुकाने उघडणार, अशी भूमिका घेतली गेली. त्यावर बैठका झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी 17 मेनंतर दुकानांना सशर्त परवानगी देऊ असे आश्‍वासन दिले आणि त्यानुसार आजपासून दुकाने सुरु करण्यात आली.


आता व्यापाऱ्यांची गंमत सुरु झालीय. अनेक छोट्या-मोठ्या दुकानांत हजारो वस्तू असतात. त्या कुठे ठेवल्यात हे नियमित व्यवहारात लक्षात राहते, मात्र सलग 52 दिवसांच्या सुटीनंतर गोंधळ व्हायचाच. तो सुरु झाल्याचे आज दिसले. अनेक दुकानांत मालकांपेक्षा कामगारांना जास्ती माहिती असते. काही ठिकाणी कामगार आले नाहीत, पोहचू शकले नाहीत किंवा कंटेन्टमेंट झोनमध्ये अडकले. त्यामुळे तेथेही मालकांची पंचाईत झाली. आता पुन्हा एकदा व्यापार सुरळित व्हावा, यासाठी सारेच प्रार्थना करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT