sangli 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीतील पेठा बंदच राहणार

सकाळवृत्तसेवा

सांगली ः लॉकडाऊनमध्ये काहीअंशी शिथिलता दिल्यानंतर आज शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडले. जीवनावश्‍यक वस्तूंसह अन्य दुकानांमध्ये रांगा लागल्या आणि तेथे सामाजिक अंतर राखले गेले नाही.

त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत सांगलीतील पेठा आता बंदच राहतील, अशी घोषणा केला. त्यामुळे केवळ नागरी वस्त्यांतील दुकाने आणि सिंगल स्टोअर सुरु होतील, बाकी दुकानांची टाळेबंदी कायम असेल.


"लॉकडाऊन संपलेला नाही, विनाकारण गर्दी करू नका', असे आवाहन केले आहे. ही स्थिती अशीच राहिली तर कलम 144 नुसार गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी कडक भूमिका घ्यावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी आज लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतरच्या परिस्थितीवर पत्रकारांशी संवाद साधला. आज लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर आलेले दिसले. वाहने धावली. काही ठिकाणी गर्दी वाढली होती.

त्याबाबत डॉ. चौधरी म्हणाले, ""हे चित्र अतिशय गंभीर आहे. कोरोनाची धास्ती कायम आहे. धोका संपलेला नाही. लोकांनी गैरसमजात राहू नये. अशा पद्धतीने गर्दी करणे अत्यंत धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी काही नियम कडक करावेच लागतील. त्यासाठी बाजारपेठांमधील दुकाने उघडता येणार नाहीत. तेथे जीवनावश्‍यक वस्तूंची वगळता अन्य दुकाने बंदच ठेवावी लागतील. सध्या 144 कलम लागूच आहे. त्यानुसार गर्दी दिसल्यास कारवाई करावी लागेल.''


 दुकानदारांवर कारवाई
जिल्हाधिकारी म्हणाले, ""जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानातही सामाजिक अंतर पाळले जात नाही. लोकांनी एकमेकापासून पाच-सहा फूट अंतरावर थांबलेच पाहिजे. तसे झाले नाही तर त्याला दुकानदार जबाबदार असतील. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हापूसला आंब्याला लेबल लागणार? महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची मागणी

Yavatmal Crime News : नग्न करून अमानुष मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, चौघांना अटक

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT