sanjay patil
sanjay patil sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : खासदार संजयकाकांच्या बाजूने उरले कोण?

सकाळ वृत्तसेवा

सांगली : भाजपचे खासदार संजय पाटील यांच्यावर आणखी एका भाजप नेत्याने दगा दिल्याचा आरोप केला आहे. आटपाडीचे नेते अमरसिंह देशमुख यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या पराभवास कारणीभूत नेत्यांच्या यादीत खासदारांचा उल्लेख केला आहे. खासदारांनी आपल्या पक्षातील उमेदवाराला सहकार्य केले नाही, असा त्यांचा आरोप आहे. भाजपमधील खासदारांवर नाराजांची यादी मोठी आहे. त्यात आणखी एक भर पडली आहे. सन २०२४ पर्यंत खासदारांच्या समर्थनात पक्षात कोण उरेल की नाही, अशी स्थिती आहे.

खासदार पाटील यांनी मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने देशातील भाजप नेत्यांशी असलेले सलोख्याचे, जिव्हाळ्याचे संबंध समोर आणले. राज्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. जिल्ह्यात मात्र कडेगावपासून जतपर्यंत आणि आटपाडीपासून सांगलीपर्यंत भाजपमधील नेत्यांचे आणि संजय पाटील यांचे संबंध ताणलेले आहेत. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासोबत वालचंद महाविद्यालयावरून संबंध ताणले. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी तर खासदारांनी दगा दिल्याचा आरोप केला. आमदार विलासराव जगताप यांनी ‘घातकी मित्र’ अशा शब्दांत त्यांना हेटाळले. महापालिका निवडणुकीतील त्यांच्या भूमिकेमुळे आमदार सुधीर गाडगीळ यांची नाराजी आहे.

मिरज पंचायत समितीत खासदारांचे लक्ष वाढल्यापासून आमदार सुरेश खाडे त्यांच्यावर नाराज आहेत. आमदार गोपीचंद पडळकर आणि खासदार पाटील यांच्यातील संघर्ष मिटण्यापलिकडे गेला आहे. आता अमरसिंह देशमुखांनी नवा आरोप करून धुरळा उडवून दिला आहे. ही सगळी प्रभावी आणि निर्णायक नेत्यांची यादी आहे, जे सांगली लोकसभा मतदार संघावर प्रभाव पाडू शकतात.

या सर्वांशी एकाचवेळी फटकून वागणारे खासदार संजय पाटील सन २०२४ ला पुन्हा लोकसभा लढवणार नाहीत का, असा मूळ प्रश्‍न चर्चेच आहे. कारण, त्यांना दिल्लीपेक्षा राज्यात अधिक रस आहे. अलिकडे त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघात पेरणीला महत्त्व दिले आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशी कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निमित्ताने जुळवून घेतले. धक्कादायक बाब म्हणजे या बेरजेच्या राजकारणात कधी काळी आर. आर. आबांशी कट्टर असलेला सगरे गटही होता. त्यामुळे २०२४ च्या विधानसभेला ते तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातून लढतील? तेच डोक्यात ठेवून लोकसभेची तमा बाळगलेली नसावी. दुसरीकडे, जिल्हाभर भाजप नेता म्हणून पुढे येण्याची संधी ते दवडत आहेत, अशीही चर्चा आहे. खासदारांभोवती सतत वादाचे वर्तुळ मात्र फिरते आहे.

‘आमच्यासोबत या...’ पण कुठे?

खासदार संजय पाटील यांनी सोमवारी एका कार्यक्रमात विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी ‘घोड्यावर बसायला तयार राहा...’, असे सांगत शिवसेना आमदार अनिल बाबर यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. २०१९ ला बाबर यांना खासदार पाटील यांनी मदत केली होती. आता स्थिती बदलली आहे. खासदारांनी वैभव यांना ‘तुम्ही आमच्यासोबत या..’, असे आमंत्रण दिले; पण आमच्यासोबत म्हणजे ‘कुठे’? हे स्पष्ट केले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT