Sangli Municipal Corporation Students grew up in semi-English schools
Sangli Municipal Corporation Students grew up in semi-English schools 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली म.न.पा. सेमी इंग्रजी शाळांत विद्यार्थी वाढले

बलराज पवार

सांगली : महापालिकेने 18 शाळांमध्ये सुरु केलेल्या सेमी इंग्लीश वर्गाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत 521 ने वाढ झाली आहे. कोरोना काळात ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. त्यामुळे पटसंख्या वाढली आहे. महापालिकेच्या सेमी इंग्लिश शाळेत सर्व सुविधांसह मोफत गणवेष तसेच प्रायोगिक तत्वावर टॅब दिले आहेत. पालकांनी पाल्याचा सेमी इंग्लिश शाळेत प्रवेश निश्‍चित करावा, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. 


आयुक्त नितीन कापडणीस आणि शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार यांनी महापालिका शाळात शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी सेमी इंग्लिश वर्ग सुरु केले आहेत. त्यासाठी शाळांच्या वर्ग खोल्या रंगवून, भिंतीवरही मुलांच्या ज्ञानात भर पडेल अशी चित्रे रंगवून भिंतींना बोलके केले आहे. त्यामुळे महापालिका शाळांचा सन 2020-21 च्या सत्रात पट 521 ने वाढ झाल्याची माहिती कापडणीस यांनी दिली. 


महापालिका शिक्षण विभागाच्या मराठी 38, उर्दु 10 आणि कन्नड दोन अशा 50 शाळा आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. डिजीटल क्‍लासरुमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी करुन घेण्यात येत आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये शाळांबद्दल विश्वास निर्माण झाला असून वर्ष 2019-20 मध्ये शाळांचा पट 4869 इतका होता. तो वाढून 5390 झाला आहे. 


कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाद्‌वारे विद्यार्थ्यांची तयारी करुन घेतली. ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी वैयक्तीक गृहभेटीच्या माध्यमातून तयारी करुन घेतली. ई लर्निंगचे माध्यमातून शिक्षण दिले. सुविधा उपलब्ध करुन शाळा अद्ययावत करुन दिल्या. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची परिक्षेची सखोल तयारी करुन बोर्ड परिक्षेच्या धर्तीवर तीन सराव चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 


कोरोना काळात पालकांची सोय व्हावी यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश सुविधा उपलब्ध करुन दिलेले आहे. सर्व मनपा शाळेत सन 2021-22 करीता पटनोंदणी सुरु झाली आहे. पाल्याचे प्रवेश जवळच्या महानगरपालिकेच्या शाळेत मोफत प्रवेश घेण्याचे आवाहन प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार यांनी केले आहे. 

महापालिकेने हे केले... 

  •  मॉडेल स्कूल निर्माण करुन सेमी इंग्लीशसाठी पर्याय दिला. 
  •  सेमी इंग्लीशच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला आहे. 
  •  प्रायोगिक स्वरुपात विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करुन दिले. 
  •  सेमी इंग्लीशसाठी तज्ज्ञ प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT