murder esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Crime : सांगलीत नामचीन गुंड सचिन टारझन याचा खून, पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात

पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार, नामचीन गुंड सचिन ऊर्फ सच्या टारझन याच्यावर आज सकाळी धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

शैलेश पेटकर

सांगली - पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार, नामचीन गुंड सचिन ऊर्फ सच्या टारझन याच्यावर आज सकाळी धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अहिल्यानगर येथे ही घटना घडली.

सच्या टारझन पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. एका खुनाच्या गुन्ह्यात तो सध्या जामिनावर बाहेर आहे. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास काही अज्ञात तरुण त्याच्या घरात घुसले.

त्या तरुणांनी सच्यावर धारदार हत्याराने हल्ला चढवला. काही मिनिटातच हल्ला करून ते पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत सच्या टारझन याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सच्या टारझनवर खुनी हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सकाळी दहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे . दरम्यान सच्या टारझनवरील हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT