नाट्यगृह  sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : नाट्यगृहाचा पडदा उघडणार; परंतु दिवाळीपर्यंत प्रतिक्षाच

सकाळ वृत्तसेवा

सांगली : कोरोना संकटाच्या काळात दीड वर्षात बोटावर मोजण्याइतपत नाटके, लावणी प्रयोग झाले. त्यानंतर रंगमंच सुनासुनाच राहिला. आता शासनाने परवानगी दिल्यामुळे २२ ऑक्टोंबरपासून नाट्यगृहांचा पडदा उघडला जाणार आहे. प्रत्यक्षात नाटके सुरू होण्यासाठी दिवाळी संपण्याची प्रतिक्षा करावी लागेल. चित्रपटगृहे मात्र रसिकांच्या शिट्ट्या ऐकण्यासाठी सज्ज झाली आहेत. २९ पासून चित्रपटगृहे सुरू होतील.

गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात ‘लॉकडाऊन’ची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अनेक गोष्टींबरोबर नाट्यगृहे व चित्रपटगृहे लॉक झाली. त्यामुळे अनेक कलाकार व पडद्यामागील कलाकारांवर मोठे संकट ओढवले गेले. काही नामांकित कलाकार मंडळी व दानशूर व्यक्तींसह सामाजिक संस्थांनी कलाकारांना मदतीचा हात दिला. त्यामुळे कलाकार मंडळींना दिलासा मिळाला. लॉकडाऊन, अनलॉकनंतर शासनाने नाट्यगृहे व चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली. सांगलीत जानेवारी २०२१ मध्ये नाटकाचा पडदा उघडला गेला. दहा महिने त्यासाठी प्रतिक्षा करावी लागली. जानेवारी ते मार्च अखेर जेमतेम सहा व्यवसायिक नाटके सांगलीत सादर झाली. त्यांना रसिकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. तसेच तीन लावण्यांचे प्रयोग व स्थानिक काही सांस्कृतिक कार्यक्रम झाले. तेवढ्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ‘ब्रेक’ मिळाला.

एप्रिल २०२१ पासून पुन्हा कोरोनामुळे निर्बंध लावण्यात आले. त्यामध्ये नाटक व चित्रपट प्रदर्शित करण्यास मनाई होती. त्यामुळे पुन्हा एकदा संकटाचा सामना करावा लागला. अखेर शासनाने २२ ऑक्टोंबरपासून ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या अटीवर नाट्यगृहे व चित्रपटगृहांना परवानगी दिली आहे. त्यामुळे रसिकांची उत्सुकता वाढली आहे. २२ पासून तत्काळ नाटकांचे प्रयोग होणार नसून आर्थिक बाबींचा विचार करून दिवाळीनंतरच नाट्यगृहे सुरू होतील.

चित्रपटगृहे मात्र सज्ज झाली आहे. २९ पासून मुक्ता आर्टस्‌मध्ये अलिकडचे दोन चित्रपट दोन स्क्रीनवर प्रदर्शित होतील. तर ५ नोव्हेंबरपासून चारही स्क्रीन सुरू राहतील. तसेच एकेरी पडदा व मल्टीप्लेक्स, ऑरम सिनेमागृह चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी लवकरच सज्ज होतील.

२४ रोजी एकांकिकेने सुरवात-

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगलीतर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींना २४ रोजी सायंकाळी ५ वाजता भावे नाट्यमंदिरात पुरस्कार दिला जाणार आहे. तत्पूर्वी रंगकर्मी यशोधन आणि कविता गडकरी यांची ‘तेरे मेरे सपने’ ही गाजलेली एकांकिका सादर होणार आहे. या एकांकिकेने नाट्यगृहाचा पडदा उघडला जाईल.

‘‘कोरोनाच्या काळात दीड वर्षात अवघे दोन महिनेच नाट्यगृहे सुरू राहिली. आता परवानगी दिली तरी ५० टक्के प्रेक्षक क्षमतेची अट घातली आहे. आर्थिक झळ सोसून नाटकांचे प्रयोग सादर करणे अशक्य आहे. त्यामुळे मायबाप सरकारने शंभर टक्के प्रेक्षक क्षमतेला परवानगी द्यावी.’’

-मारूती गायकवाड (नाट्य संयोजक)

‘‘मुक्ता आर्टस्‌मध्ये दोन स्क्रीन २९ पासून सुरू होत आहेत. ५ नोव्हेंबरपासून चारही स्क्रीन सुरू राहतील. ५० टक्के प्रेक्षक क्षमता असणार आहे. तसेच रसिकांनी कोविड प्रतिबंधक दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवून सहकार्य करावे.’’

-सचिन वाले (सरव्यवस्थापक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT