पश्चिम महाराष्ट्र

कुत्र्यांच्या हल्ल्यात सांगलीत दहा बकरी ठार

विजय पाटील

सांगली - येथील शामरावनगरमध्ये पहाटेच्या सुमारास मोकाट कुत्र्यानी पाळलेल्या बकऱ्यांच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर या कळपातील दहाही बकरी ठार झाली आहेत. या घटनेने परिसरात भटक्या कुत्र्यांच्या बाबत संताप व्यक्त केला जात आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शामरावनगरमध्ये महाराजा भडंग कारखाना जवळ ईलियास हमिद रहिमतपूरे याचा शेळीचा गोटा आहे. पहाटेच्या सुमारास मोकाट कुत्र्यांनी या गोट्यातील बकऱ्यावर हल्ला केला. यामध्ये तब्बल 10 बकरी ठार झाली आहेत. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे..  महापालिका या मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करत नसल्याचा आरोप ही केला जात आहे. मोकाट कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलांनाही जखमी केल्याच्या घटना या परिसरात घडल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT