पश्चिम महाराष्ट्र

डॉ. खिद्रापुरेसह 14 जणांवर दोषारोपपत्र

सकाळवृत्तसेवा

सांगली - संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील गर्भलिंग हत्याप्रकरणी मुख्य आरोपी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्यासह 14 जणांविरुद्ध पोलिसांनी जिल्हा न्यायालयात अठराशे पानी दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तो जलदगती न्यायालयात चालवला जावा, अशी विनंती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

शिंदे म्हणाले, 'स्वाती जमदाडे (रा. मणेराजुरी) या महिलेला दोन मुली असल्याने गर्भलिंग तपासणी करून गर्भपात केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आणि 3 मार्च रोजी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर 89 दिवस अविरत तपास करून आज दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणी जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असलेली कलमे लावण्यात आली आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेताना ऍड. हर्षद निंबाळकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली आहे. आता सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, अशी विनंती आम्ही करणार आहोत.''

मुख्य आरोपी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे, मृत महिलेचा पती प्रवीण जमदाडे, गर्भलिंग तपासणी करणारा डॉ. श्रीहरी घोडके व डॉ. रमेश देवगिरीकर, परिचारक उमेश साळुंखे, परिचारिका कांचन रोजे, गोळ्या पुरविणारा सुनील खेडेकर, एजंट सातगोंडा पाटील व यासीन तहसीलदार, डॉक्‍टर-एजंट संदीप जाधव, विरणगौंडा गुमटे, औषध वितरक भरत गटागट, औषध कंपनी प्रतिनिधी दत्तात्रय भोसले आणि गर्भाची विल्हेवाट लावणारा गवळी रवींद्र सुतार यांच्याविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

पैसे उकळण्याचा धंदा
अधीक्षक शिंदे यांनी या प्रकरणी धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले, 'या तपासात "डीएनए फिंगरप्रिंट प्रोफाइल तंत्रा'चा वापर करण्यात आला. त्यातून आठ अर्भकांचा तपास करणे शक्‍य झाले. त्यापैकी पाच अर्भके ही मुलगे असून, तीन मुली आहेत. याचा अर्थ या डॉक्‍टरांकडे एकदा का गर्भवती महिला आली, की गर्भ मुलीचा अथवा मुलाचा असला तरी गर्भपात करायला लावून पैसे उकळणे एवढाच धंदा होता, हेही लक्षात घेतले पाहिजे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT