पश्चिम महाराष्ट्र

चौसष्ट घरांचा ‘काबील’ राजा

योगेश घोडके

अंध आर्यन जोशी करतोय बुद्धिबळात लक्षवेधी कामगिरी
सांगली - काळ्या-पांढऱ्या चौकटींनी भरलेल्या पटावरील पुढची चाल आपणाला कुठे नेईल, याचा डोळे विस्फारून, डोक्‍याला हात लावून गहन विचार करणारे खेळाडू म्हणजे बुद्धिबळपटू. पण, त्या पटावरील प्यादी, घोडा, राजा अन्‌ उंट कुठे आहे हे डोळ्यानं पाहू न शकणारा अंध खेळाडूही चौसष्ट घरांचा ‘काबील’ राजा बनू शकतो, हे डोंबीवलीच्या आर्यन जोशी याने दाखवण्याचा निर्धार केला आहे. या अंध खेळाडूची बुद्धिबळातील वाटचाल आशावर्धक असून तो डोळस बुद्धिबळपटूंना तगडे आव्हान देतोय.

आर्यन सध्या दहावीत शिकतो. त्याने नुकत्याच येथे झालेल्या नूतन बुद्धिबळ मंडळाच्या बुद्धिबळ महोत्सवात सहभाग घेतला. त्याला बाजी मारता आली नाही, मात्र आपल्या खेळाने साऱ्यांना प्रभावित केले. वडील  भालचंद्र जोशी हेच त्याचे डोळे आहेत. त्यांच्या सहकार्याने या पटावर राज्य करण्याचा त्याचा मानस  आहे. जन्मजात अंध असलेला आर्यन म्हणतो,‘‘मला रंग माहितीच नाही, त्याचं कधी वाईटही वाटलं नाही. बुद्धिबळ हा बुद्धीचा खेळ आहे, देवाने मला ती दिलीय. त्याचा आनंद घेतोय.’’ असं तो सांगतो. 

वडिलांनी त्याला २०१२ पासून पुस्तके वाचून बुद्धिबळाचे धडे दिले. थोडं ऐकूण, थोडं स्पर्शातून मी चाली शिकत गेलोय. एकेक चाल शिकायला ३ वर्षे लागली. ‘डी-फोर’ तंत्राच्या सहाय्याने डाव खेळायला लागलो. त्यावरील प्रेम वाढत गेले. गेल्यावर्षी रघुनंदन गोखले यांच्याकडे बुद्धिबळाचे धडे घ्यायला सुरवात केली. यंदा एप्रिलमध्ये हैदराबाद येथे झालेल्या दृष्टिबाधित बुद्धिबळ स्पर्धेत १२० जणांत तो पहिला आला. धारावीत राष्ट्रीय दृष्टिबाधित स्पर्धेत चौथा आला. जागतिक चेस ऑलिंपियाडसाठी निवड झाली. आशियाई चषकात चौथा आला. गेल्यावर्षी राज्य व राष्ट्रीय अपंगांच्या स्पर्धेत चार सुवर्ण पटकावले. तो म्हणाला,‘‘मला पोहण्याचीही आवड आहे. त्या स्पर्धेतही सहभागी होतो. मित्राच्या साथीने सहावेळा ट्रेकिंग केले आहे. अंध मुलांसाठी काहीतरी करण्याचा निर्धार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT