पश्चिम महाराष्ट्र

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद

सकाळवृत्तसेवा

सांगली - अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे  एप्रिलपासूनच थकीत मानधन तातडीने द्यावे, मानधनवाढ द्यावी, खाण्यायोग्य आहार द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे जिल्हा परिषद कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढला.  शासना विरोधात जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला. दिल्ली, मुंबईचं सरकार काय... म्हणतंय, वेतन द्यायला न्हाय म्हणतंय.., होश मे आओ... होश मे आओ... हमसे जो टकरायेका... मिठ्ठी मे मिल जाएगा..! ’ आदी घोषणा देण्यात आल्या. मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले. 

कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षा मंगला सराफ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.  जिल्हाभरातून मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनिसांची हजेरी लावली. जिल्हाध्यक्ष स्नेहलता कोरे, आनंदी भोसले, नादिश नदाफ, अरुणा झगडे यांनी नेतृत्व केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. तरी प्रश्‍न सुटले नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांत सरकारविरोधात मोठा असंतोष दिसून आला. 

प्रमुख मागण्या अशा - राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसाठी नेमलेल्या शिफारस स्वीकारून तातडीने मानधनवाढ द्यावी, अंगणवाडीतील मुलांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट असतो. केवळ ३ टक्के मुले आहार खातात. बाकी वायाच जातो. खाण्यायोग्य आहार द्यावा, आहारासाठी प्रतिलाभार्थी ४.४२ रुपये मिळतात, त्यात महागाईच्या पटीत तीनपटीने वाढ करावी, एप्रिलपासून मानधन न मिळाल्यामुळे उपासमारी सुरू झाली आहे. मार्चपासूनचे तातडीने मानधन द्यावे, एप्रिल २०१४ पासून निवृत्त झालेल्या  कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीची रक्कम तातडीने द्यावी, लाभार्थीच्या आहाराचे पैसे न दिल्यामुळे पुरवठादार अडचणीत आले आहेत. मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा फरक द्यावा, रिक्त जागांवर सेविका, मदतनिसांची नेमणूक करावी, प्रवास खर्चाची सन २०११ पासूनची रक्कम मिळावी आदी मागण्यांचा समावेश आहे. 

कमल साळुंखे, रेखा साळुंखे, नीलप्रभा लोंढे, मधुमती मोरे, वंदना सकळे, अलका विभूते, अलका माने,  विजया जाधव, शुभांगी कांबळे, कल्पना पवार, माधुरी जोशी, मथुरा कांबळे, सुलोचना पाटील, सरला घोडे, बिस्मिल्ला मुल्ला, सुरेखा गायकवाड, जयश्री जाधव, कस्तुरा पट्टणशेट्टी, अरुणा जोशी, दयावती अजेटराव, मंगल माळी यांनी मोर्चाचे संयोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT