Babasaheb Ambedkar Welcome Arch Controversy esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli : बेडगमध्ये JCB नं पाडली आंबेडकरांच्या नावाची कमान; दोन ग्रामसेवकांचं निलंबन, 'सीईओं'ची मोठी कारवाई

सात दिवसांत खुलासा करण्याची केली होती सूचना

सकाळ डिजिटल टीम

बेडग येथील स्वागत कमान पाडल्याबाबत सुरेखा कल्लाप्पा कांबळे यांनी ५ जुलै रोजी प्रशासनास निवेदन दिले होते.

सांगली : बेडग (ता. मिरज) येथील कमान पाडल्याप्रकरणी दोन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली. ग्रामसेवक बी. एल. पाटील आणि ग्रामसेवक एम. एस. धेंडे अशी त्यांची नावे आहेत. निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे (Trupti Dhodmise) यांनी दिले.

बेडग येथील स्वागत कमान पाडल्याबाबत सुरेखा कल्लाप्पा कांबळे यांनी ५ जुलै रोजी प्रशासनास निवेदन दिले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ग्रामपंचायत (Bedag Gram Panchayat) विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.

दरम्यान, लोखंडे यांच्यासह मिरजेचे गटविकास अधिकारी यांनी समक्ष भेट देऊन माहिती घेतली. त्यांनी ग्रामपंचायतीकडील कागदपत्रांची तपासणी केली होती. त्यात संबंधितांनी केलेली कारवाई ही ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ५२ (२ अ) व ५३ (१) नियमानुसार सदोष आहे.

त्यामुळे सरपंच, सदस्य व ग्रामसेवकांना नोटीस दिली होती. सात दिवसांत खुलासा करण्याची सूचना केली होती. त्यानुसार ग्रामसेवकांनी खुलासा सादर केला आहे. मात्र, खुलासा समाधानकारक नसल्याने ही कारवाई केली.

ग्रामसेवकाची उच्च न्यायालयात धाव

जिल्हा परिषदेच्या कारणे दाखवा नोटिशीविरोधात ग्रामसेवक बी. एल. पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेत दावा दाखल केला आहे. त्यात कोणतीही कारवाई करण्यास विरोध दर्शविला आहे. उच्च न्यायालयात दावा दाखल केलेला असल्याने ग्रामसेवकावर कोणतीही कारवाई करू नये, असे नोटिशीत म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्ताराधिकारी आणि बेडग ग्रामपंचायतीला या नोटिशीच्या प्रती पाठवल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT