पश्चिम महाराष्ट्र

चोऱ्यामुळे सांगली बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद

सकाळवृत्तसेवा

सांगली - सांगली बाजार समितीत गेल्या दोन वर्षांत पंधराहून अधिक दुकाने चोरट्यांनी फोडली. आवारातील चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत व्यापाऱ्यांनी आज बंद ठेवला. आजपासून (ता. ५) बेमुदत बंदचा इशाराही त्यांनी दिला आहे. बाजार समितीने चोऱ्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी त्यांची मागणी आहे.

उपाययोजना करेपर्यंत व्यापार सुरू केला जाणार नाही, अशा त्यांनी इशारा दिला आहे. बाजार समिती आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय यापूर्वीच झाला. मात्र त्यांची तातडीने अंमलबजावणी झाली नाही.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत आवारात हळद, गूळ आणि बेदाण्याची मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणी दररोज शेकडो गाड्या मालाची आवक होते. दररोज सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल होते. जिल्ह्यासह परराज्यातील मालाची आवक होत असल्याने सांगलीची प्रसिद्ध बाजारपेठ म्हणून ओळख आहे. राज्यात नावारूपास आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला मागील काही महिन्यांपासून चोरीच्या समस्यांनी ग्रासले आहे. बुधवारी मध्यरात्री मार्केट यार्डातील तीन दुकाने चोरट्यांनी फोडली. चोरीमुळे व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले. बाजार समितीत वारंवार चोऱ्या होत असल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त करून व्यापार बंदचा निर्णय घेतला आहे.

बाजार समितीकडून चोऱ्या रोखण्यासाठी ठोस  उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे बाजार समिती आवारात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. चेंबर ऑफ कॉमर्समध्ये बाजार समितीतील व्यापाऱ्यांची बैठक झाली. बाजार समिती प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली. चोऱ्या रोखण्यासाठी बाजार समितीकडून उपायोजना केले जात नाहीत. चोऱ्यांच्या पार्श्‍वभूमीवर बेमुदत बंदचा व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला. हमाल आणि तोलाईदारांनी बंदमध्ये सहभागी होणार आहेत.  

सीसीटीव्हीची प्रक्रिया अपूर्ण
बाजार समिती आवारात ३० व विष्णुअण्णा फळ बाजारात १५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांपूर्वी निर्णय झाला, मात्र प्रक्रिया अपूर्ण आहे. याबाबत संचालक बाळासाहेब बंडगर यांनी सीसीटीव्ही नसल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याची बाब गंभीर असल्याचे स्पष्ट केले. त्यात काही मंडळी जाणीवपूर्वक विरोध करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT