पश्चिम महाराष्ट्र

कोथळे कुटुंबीयांचे उपोषण 

सकाळवृत्तसेवा

सांगली - पोलिस कोठडीतील मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. या प्रकरणात तपास गतीने व्हावा, वरिष्ठ पोलिस अधिकारी दोषी असल्याने त्यांनाही सहआरोपी करावे, अशा मागण्या त्यांनी पुन्हा एकदा लावून धरल्या. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी त्यांच्याशी चर्चा केली. 

अनिकेतच्या खून प्रकरणी त्यांचे कुटुंबीय आक्रमक आहेत. त्याच्या भावांनी आठवडाभरापूर्वी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्याविरुद्ध कारवाई झाली, मात्र या प्रकरणात दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष का केले जातेय, असा त्यांचा आरोप आहे. सीबीआय चौकशी, बदली झालेल्या पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांना सहआरोपी करणे, अशा प्रमुख मागण्या घेऊन त्यांचा लढा सुरू आहे. त्यांनी उपोषण सुरू करताच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कक्षात पाचारण केले. तेथून आमदार सुधीर गाडगीळ यांच्याशीही त्यांनी मोबाईलवरून चर्चा केली. त्यात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, याची हमी मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. अनिकेतची पत्नी संध्या, भाऊ आशिष व अमित, आई, चुलते यांच्यासह शिवसेनेच्या रेखा पाटील आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT