पश्चिम महाराष्ट्र

सांगलीतील पोलिसाच्या खून प्रकरणी हल्लेखोरास अटक

बलराज पवार

सांगली - मिरज शहर पोलिस ठाण्याकडील पोलिस कर्मचारी समाधान मांटे याच्यावर धारदार हत्याराने वार करुन खून केल्या प्रकरणी मुख्य संशयित हल्लेखोर झाकीर जमादार यास कोल्हापुरात काल (बुधवारी) रात्री अटक करण्यात आली.

कुपवाड रोडवरील हॉटेल रत्ना डिलक्‍स येथे मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. बिल देण्याच्या वादातून हा खून झाला होता. हॉटेलच्या सीसीटीव्हीत खुनाची घटना रेकॉर्ड झाल्याने त्यावरुन शोध घेत पोलिसांनी झाकीरच्या दोन साथीदारांना अटक केली होती. तर रात्री कोल्हापुरात राजवाडा चौक पोलिसांना त्याला जेरबंद केले.

समाधान मांटे मंगळवारी रात्री ड्यूटी संपवून घरी येताना ते हॉटेल रत्ना डिलक्‍समध्ये दारू पिण्यास गेले. तेथे काऊंटरवर उभे असताना झाकीर जमादार याचा मॅनेजरशी बिलावरून वाद सुरू होता. त्यावेळी मांटे यांनी त्याला पोलीसी खाक्‍या दाखवला. त्याचा राग येऊन झाकीरने आपल्या अतहर नदाफ आणि
अन्सार पठाण या मित्रांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर समाधान मांटे हॉटेल व्यवस्थापकाशी बोलत गेटजवळ आले. तेथे झाकीरने हातातील हत्याराने मांटेवर सपासप सतरा ते अठरा वार केले. यात मांटे जागेवरच ठार झाले.

पोलिसांनी वेगाने तपास करत झाकीरच्या दोन्ही साथीदारांना
हडको कॉलनीतून अटक केली. तर झाकीर सांगलीतून बाहेर पळून गेला होता. त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन कसबे डिग्रज दाखवत होते. त्यावरुन पोलिसांनी त्याच्याबद्दल अधिक माहिती घेतली असता तो कोल्हापूरात शिक्षणासाठी होता. त्यामुळे तेथे त्याचे मित्र होते. तो तिकडे गेला असल्याच्या संशयावरुन कोल्हापुरातही तपासासाठी फिल्डींग लावली.

कोल्हापूरमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या पथकांनी त्याचा शोध सुरु केला. रात्रीच्या सुमारास त्याला राजवाडा पोलिसांच्या मदतीने कोल्हापुरात अटक केली. त्याला आज सांगलीत हजर करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT