पश्चिम महाराष्ट्र

लोकसभेसाठी नवी दीडपट मतदान यंत्रे

सकाळवृत्तसेवा

सांगली -  सन २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी देशभरात नवीन इलेक्‍ट्रॉनिक्‍स मतदान यंत्रे (ईव्हीएम) देण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व जिल्ह्यांतून आवश्‍यक यंत्रांची आकडेवारी मागवली आहे. आवश्‍यक यंत्रांच्या दीडपट यंत्रांचा पुरवठा केला जाईल.

यंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड होऊ नये, यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी ‘स्ट्राँग रूम’साठी जागांची निवड करण्यात येत आहे. बांधकामासाठी आवश्‍यक निधीचा तपशील मागवण्यात आला आहे. 

जिल्हा निवडणूक शाखेतून या प्रक्रियेविषयी हालचालींची माहिती मिळाली. त्यानुसार सन २०१९ च्या निवडणुकीसाठीच्या प्राथमिक टप्प्यातील हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढील वर्षी मेपासून मतदार याद्यांसह अन्य प्रक्रिया सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्या आधी मतदान यंत्र बदलाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून आवश्‍यक माहिती मागवण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सुमारे ४ हजार मतदान यंत्रांची आवश्‍यकता आहे. त्याच्या दीडपट म्हणजे सुमारे ६ हजार मतदान यंत्रे मिळतील, असे सांगण्यात आले. देशात अनेक ठिकाणी मतदान यंत्रांत घोटाळा असल्याच्या तक्रारी सन २०१४ च्या निवडणुकीनंतर सुरू झाल्या. कोणतेही बटण दाबले तर एकाच चिन्हाला मतदान होते, अशा स्वरूपाच्या तक्रारी अधिक होत्या. त्यामुळे पुढील निवडणुकीत सर्वच नवीन यंत्रांवर मतदान घेतले जाणार आहे. या यंत्रांमध्ये गडबड किंवा छेडछाड होते, असा आरोप केला जातोय. 

स्ट्राँग रूमसाठी चंदनवाडीतील जागा
या पार्श्‍वभूमीवर ही यंत्रे अत्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्ट्राँग रूम बांधल्या जाणार आहेत. सांगली जिल्ह्यासाठी सांगली-मिरज रस्त्यावरील चंदनवाडी येथील एसटीच्या कार्यशाळेलगतची जमीन सुचवण्यात आली आहे. तेथे बांधकामासाठी किती निधी लागेल, याविषयीचा प्राथमिक अंदाज घेतला जातोय. पुढील सहा महिन्यांत या प्रक्रियेला अंतिम स्वरूप येईल, असे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT