Sangli News 
पश्चिम महाराष्ट्र

Sangli : मटका बंद करा, अन्यथा अधिकृत करा; वर्षा निंबाळकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

वर्षा निंबाळकर व अमर निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्‍यांना भेटून याबाबत निवेदन दिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

सांगली - पालिकेच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये खुलेआम मटका सुरू आहे. अनेकवेळा मागणी करूनही कारवाई होत नाही. त्यामुळे गोरगरिबांची कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. प्रशासनाने एक तर मटका कायमस्वरूपी बंद करावा, अन्यथा मटका व्यवसायाला अधिकृत परवानगी द्यावी, अशी संतप्त मागणी माजी नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

वर्षा निंबाळकर व अमर निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्‍यांना भेटून याबाबत निवेदन दिले आहे.

निंबाळकर म्हणाल्या,‘‘प्रभाग क्रमांक दहामधील वडर कॉलनी, रेल्वे स्टेशन, मार्केट यार्ड, प्रेमनगर, गोकुळनगर, स्वरूप टॉकीज परिसर, उत्तर शिवाजीनगर, कॉलेज कॉर्नर परिसर, टिंबर एरिया, नवीन वसाहत आदी ठिकाणी खोकी स्वरूपातील दुकानांमध्ये मटका घेण्याचा प्रकार सुरू आहे.

या भागातील शाळेत जाणाऱ्‍या लहान मुलांपासून ते वयोवृध्दांपर्यंत व महिलादेखील या मोहजालाच्या आहारी जात आहेत. बहुसंख्य कामगार हे मटक्याच्या आहारी जाऊन मिळालेली मजुरी यात घालवत आहेत. त्यामुळे रोज या मजुरांच्या कुटुंबामध्ये वाद-विवाद निर्माण होत असून, अनेक कुटुंबांचे संसार रस्त्यावर येत आहेत.

भागातील गुन्हेगारीचे प्रमाण घटत होते, परंतु आता गुन्हेगारी वाढत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने हा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावा अन्यथा या कायदेशीर मान्यता द्यावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT