पश्चिम महाराष्ट्र

जत जहागिरीचे संस्थापक सटवाजीराव डफळे यांच्या समाधीचा शोध

संतोष भिसे

मिरज- शिवकालीन प्रसिद्ध सरदार आणि जत जहागिरीचे मूळ संपादक सटवाजीराव डफळे यांची डफळापूर येथील समाधी उजेडात आली आहे. उमराणीचे जहागीरदार अमरसिंहराजे डफळे यांच्या प्रयत्नातून आणि इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांच्या अभ्यासातून या शूर योद्धयाच्या स्मृती स्थळाला उजाळा मिळाला आहे. या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प डफळे आणि गायकवाड कुटुंबियांनी केला आहे.

शिवकालीन प्रसिद्ध योध्दे सटवाजीराव डफळे यांची समाधी डफळापूर येथील सुभाषराव गायकवाड यांच्या शेतात असल्याची माहिती उमराणीचे जहागीरदार अमरसिंह डफळे यांना मिळाली होती. त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करुन माहिती घेतली. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांनी या समाधीस्थळाचा अभ्यास केला. त्यांची बांधकाम शैली आणि भव्यता पाहून ही प्रसिद्ध पुरूषाचीच समाधी असल्याचा निर्वाळा दिला. घराण्यातील अन्य व्यक्तिचा अभ्यास केला असता ही समाधी सटवाजीराव डफळे यांचीच असल्याची खात्री झाली.  

डफळापूर गावात प्रवेश करताना सुभाषराव गायकवाड यांच्या शेतात ही समाधी आहे. गायकवाड घराणे हे डफळे घराण्याचे नजीकचे आप्त असल्याने त्यांनी आजवर या समाधीचे जतन करून ठेवले होते. या समाधीचा जीर्णोद्धार करण्याची कल्पना डफळे आणि गायकवाड कुटुंबियांनी मांडली. त्यानुसार एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात समाधीभोवती असणारी झाडे झुडपे काढण्यात आली. आणि परिसर स्वच्छ करण्यात आला. अमरसिंह डफळे, सुभाषराव गायकवाड, रमेश गायकवाड, सुरेशराव डफळे, विक्रमसिंह डफळे, बाळासाहेब  गायकवाड, धैर्यशीलराव डफळे, संग्रामसिंह डफळे, राहूल डफळे, खर्डेकर सरकार, अमरसिंह इंगोले, बाप्पासाहेब डफळे, जयवंतराव डफळे, मोहनराव गायकवाड, रमेश शिंदे, वसंतराव चव्हाण, परशुराम चव्हाण यांच्या सह डफळापूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते. गायकवाड कुटुंबियांनी ही समाधी जतन करून ठेवल्या बद्दल अमरसिंह डफळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

सटवोजीराव डफळे हे पराक्रमी योध्दे होते. अदिलशहाने त्यांना जत, करजगी, होनवाड, बारडोल या चार गावांचे देशमुखी वतन दिले होते. त्या काळातील अनेक लढायात त्यांनी पराक्रम गाजवला. पुढे मोगल काळातही त्यांना नवी वतने मिळाली. सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली ही त्यांनी काही लढायांत मर्दुमकी गाजवली. सन १७०६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची समाधी त्यांचे वास्तव्याचे ठिकाण असलेल्या डफळापूर गावी बांधण्यात आली.  

सध्या ही समाधी डफळे यांचे आप्त असणाऱ्या गायकवाड यांच्या शेतात आहे. या पराक्रमी योद्धयाच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प डफळे आणि गायकवाड कुटुंबियांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT