पश्चिम महाराष्ट्र

मांगले सरपंचाची खुर्ची जप्त करा

सकाळवृत्तसेवा

सांगली - मांगले (ता. शिराळा) ग्रामपंचायतीकडे पाच कर्मचाऱ्यांचे चार लाख रुपये थकीत आहेत. या प्रकरणी न्यायालयाने थकीत रक्कम देण्याचे आदेश देऊनही ते पाळले नसल्याबद्दल तेथील सरपंच, उपसरपंचांची खुर्ची, टेबल, कपाटे, वसुली रजिस्टर, बॅंकेचे पास बुक आणि संगणक जप्त करून त्यांची विक्री करून कर्मचाऱ्यांना त्वरित रक्कम देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मांगले ग्रामपंचायतीचे कर्मचारी शिवाजी रामचंद्र मोरे, आनंदा बापू कांबळे, संतोष श्रीपती तडाखे, संदीप विष्णू तडाखे या चार कर्मचाऱ्यांचे चार लाख पन्नास हजार रुपयांची थकीत देणी ग्रामसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी दिले नव्हते. या प्रश्नावर कर्मचाऱ्यांनी सांगलीचे कामगार आयुक्तांकडे दाद मागितली होती. आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम देण्याचा निकाल दिला होता. तरीही थकीत देणी भागवली नाहीत. म्हणून संबंधित कामगारांनी या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली. ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे (आयटक संलग्न)  जिल्हा जनरल सेक्रेटरी ॲड. राहुल जाधव यांनी या कामगारांची थकीत रक्कम मिळण्यासाठी न्यायालयात  बाजू मांडली.

न्यायालयाने याबाबत १५ फेब्रुवारीस निकाल दिला  असून त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेसाठी मांगलेतील सरपंच, उपसरपंच यांच्या खुर्च्या, टेबल, कपाटे, वसुली रजिस्टर, बॅंकेची पासबुके, संगणक जप्त करण्यात यावे. त्यानंतर जप्त मालमत्तेची विक्री करून येणाऱ्या रकमेतून कर्मचाऱ्यांची कायदेशीर देणी त्वरित द्यावेत, असे आदेश दिले आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे ॲड. जाधव यांनी सांगितले.

मांगले ग्रामपंचायतीच्या पाच कर्मचाऱ्यांच्या पगारातून ८.३३ टक्के प्रमाणे चार वर्षांपासून फंडाची रक्कम  कपात केली आहे. ही रक्कम दोन लाखांहून अधिक  आहे. ती कर्मचाऱ्यांच्या खात्यावर भरलेली नसल्यामुळे त्या रकमेचा गैरव्यवहारच झालेला आहे. या  रकमेबाबतही फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. 
- ॲड. राहुल जाधव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT