सांगली ः पोलिस कोठडीत संशयितांच्या मृत्यूप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक कामटेंसह पाच जणांना न्यायालयात नेताना पोलिस.
सांगली ः पोलिस कोठडीत संशयितांच्या मृत्यूप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक कामटेंसह पाच जणांना न्यायालयात नेताना पोलिस.  
पश्चिम महाराष्ट्र

हैवान कामटेसह पाच जणांना कोठडी 

सकाळवृत्तसेवा

सांगली -  लूटमार प्रकरणी संशयित म्हणून पकडलेल्या तरूणाला पोलिसांनी थर्ड डिग्री वापरली. त्याता त्याचा पोलिस ठाण्यातच मृत्यू झाला. प्रकरण अंगलट येते आहे समजून त्याचा मृतदेह अंबोलीजवळ जाळण्यात आला. या प्रकरणी अटक झालेल्या हैवान सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज कामटेसह पाच जणांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायाधिशांनी सर्वाना पोलिस कोठडीचा आदेश दिला. उपनिरीक्षक कामटेसह अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलिस झाकीर पट्टेवालेचा समावेश आहे. 

पोलिस अनिल लाडला मात्र तपास कामासाठी पोलिसांनी ताब्यात ठेवल्याने न्यायालयात हजर केले नव्हते. मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. खापे यांनी सर्वांना 13 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, आज दुपारी दीडच्या सुमारास या सर्वांना न्यायालयात आणणार असल्याने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. 

याबाबतची माहिती अशी, की कोल्हापूर रस्त्यावर सांगली आकाशवाणीजवळ एका अभियंत्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून दोन हजार रुपये आणि मोबाईलची लूट केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी संशयित म्हणून अनिकेत कोथळे (वय 23) आणि अमोल भंडारे (26, दोघे भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) यांना दोन दिवसांपूर्वी अटक केली. दोघांना सोमवारी (ता. 6) रात्री चौकशीसाठी बाहेर काढल्यावर दोघेही पळाले, असा पोलिसांनी प्रथम बनाव रचला. अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांना अनिकेतच्या घातपाताची शंका आल्याने प्रकरण तापले. मंगळवारी शहरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यात भर पडली. त्याच दिवशी रात्री या गंभीर घटनेचा पर्दाफाश करण्यात आला. त्यातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

उपनिरीक्षक युवराज कामटेसह अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानी गुन्ह्याची कबुली दिली आहे. खून करुन त्याचा मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे नेऊन एकदा नव्हे दोनदा जाळण्यात आला. त्यानंतर या हैवानांचा प्रताप समोर आला. कामटेसह साऱ्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 13 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. सरकार पक्षातर्फे उज्ज्वला आवटे यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायदंडाधिकारी पी. पी. खापे यांनी आदेश दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Constituency : नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांच्या दारी महाजन; बंद दाराआड सव्वा तास चर्चा

Latest Marathi News Live Update : चीनमध्ये भूस्खलनात वाहून गेला हायवे; भीषण अपघातात सुमारे 19 ठार - रिपोर्ट

World Cupसाठी निवड झालेल्या 15 खेळाडूंची कशी आहे IPL मधील कामगिरी? उपकर्णधार पांड्या ठरतोय फ्लॉप

Shah Rukh Khan: "तो तर बॉलिवूडचा जावई, मी त्याला तेव्हापासून ओळखतोय, जेव्हा तो.."; किंग खानकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

Gold ETF: ‘ईटीएफ’ देतेय ‘सोन्या’सारखी संधी; गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायामुळे चलती

SCROLL FOR NEXT