पश्चिम महाराष्ट्र

व्यापारी अपहरण प्रकरणी संशयितास हरियाणात अटक 

सकाळवृत्तसेवा

सांगली - सांगलीतील तांदूळ व्यापाऱ्याला दिल्लीत अपहरण केल्या प्रकरणी एकास गुंडाविरोधी पथकाने हरियाणात जाऊन अटक केली. अटक केलेल्या संशयिताचे नाव मोहम्मद हासिम शहाबुद्दीन (वय22) असे असून त्याला न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

या अपहरण प्रकरणात चार जणांची टोळी सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

शहरातील तांदूळ व्यापाऱ्याचे दिल्लीत अपहरण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. मात्र पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी अधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करत कौशल्याने या अपहरणाचा छडा तीन दिवसात लावून संशयित आरोपीस हरियाणात जाऊन अटक करण्यात यश मिळवले. 

सहायक पोलिस निरीक्षक श्री. डोके यांनी सांगितले की, शहरातील अबिद अबानूर शिवाणी (वय 55) हे तांदूळ व्यापारी आहेत. त्यांच्याशी दिल्लीतील व्यापाऱ्याने संपर्क साधून बोलवून घेतले. शिवाणी दिल्लीत गेले असता विमानतळाबाहेर एका रिट्‌झ गाडीतून आलेल्या चौघांनी त्यांचे अपहरण केले. त्यांना घेऊन ते अज्ञातस्थळी गेले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून बारा लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोड होऊन तीन लाख रुपये देण्याची तयारी कुटुंबीयांनी दर्शवली. अपहरणकर्त्याने बॅंक खात्यात तीन लाख रुपये भरण्यास सांगून खाते नंबर शिवाणी कुटुंबियांना सांगितला. त्यामध्ये त्याने मागणी केलेली रक्कम भरली. रक्कम जमा झाल्याचे समजल्यानंतर अपहरणकर्त्याने व्यापाऱ्याची सुटका केली. 

दरम्यान, गुंडाविरोधी पथक दिल्लीकडे रवाना झाले होते. त्यांनी अपहरणकर्त्याच्या बॅंकेशी पत्र व्यवहार करुन दिलेल्या खाते नंबरचे खाते गोठवले. कॅनरा बॅंकेच्या हाथिण (जि. पलिवल, हरियाणा) येथील शाखेत हे खाते आहे.

श्री. डोके म्हणाले,"" अपहरणकर्त्या व्यापाऱ्याने मोहम्मद हासिम शहाबुद्दीनला (रा. रुपडागा, ता. हाथिण) दीड लाख रुपयांचा धनादेश दिला होता. त्यावरुन पैसे काढण्यासाठी तो बॅंकेत आला असताना त्याला तेथेच ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर हाथिणच्या न्यायालयात हजर करुन त्यांच्याकडून त्याची कोठडी घेतली आणि त्याला सांगलीत आणण्यात आले.'' 

ते म्हणाले,"" या प्रकरणात चार आरोपी आहेत. त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल. स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. अधीक्षक सुहेल शर्मा आणि अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी हरियाणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन तेथे मदत देण्यास सांगितले. त्यामुळे या प्रकरणाचा लवकर छडा लागला.''

या कारवाईत गुंडाविरोधी पथकाचे अरुण औताडे, मघेराज रुपनर, आर. एन. देशिंगकर आणि बिरोबा नरळे हे पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT