पश्चिम महाराष्ट्र

कौस्तुभ पवारचे बॅंक खाते गोठवले

सकाळवृत्तसेवा

सांगली - मलेशियात हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणाऱ्या पोलिसपुत्र कौस्तुभ पवारच्या घराची पोलिसांनी झडती घेतली; पण तेथे काही महत्त्वाचे सापडले नाही. त्याचे बॅंक खाते गोठवण्यात आले. त्याने आणखी काहीजणांची फसवणूक केली आहे का, याचा कसून शोध पोलिस घेत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - कुपवाडमधील कौस्तुभला पोलिसांनी बुधवारी अटक केली. न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश काल दिला. त्याने मलेशियात हॉटेल मॅनेजर म्हणून नोकरी लावण्याचे  आमिष दाखवून गुरुनाथ कुंभार, मोहन शिंदे, दीपक माने आणि सदानंद धनगर यांची फसवणूक केली आहे. त्याने आणखी काही तरुणांची फसवणूक केली आहे का याचा शोध सुरू आहे. त्यासाठी कौस्तुभच्या कुपवाडमधील घराची झडती घेतली. 

कौस्तुभने फसवणूक केलेल्या तरुणांकडून दीड ते अडीच लाखांपर्यंत रक्कम उकळली. त्यांना वर्क व्हिसा दिला नाही. ट्रॅव्हल व्हिसा संपल्यानंतरही त्यांच्याकडे वर्क व्हिसा नसल्याने मलेशियाच्या पोलिसांनी त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. 

कौस्तुभवर कारवाई करताना पोलिसांनी त्याच्या बॅंक खात्याची तपासणी केली. त्यात फार मोठी रक्कम  आढळून आली नाही. एका बॅंकेत त्याचे खाते असून तो तरुणांकडून रोख रकमेसह धनादेशाद्वारेही पैसे स्वीकारत असे. ते पैसे त्याच्या बॅंक खात्यात जमा होत. त्याने प्रकरण उघडकीस आल्यानंतर गायब होऊन बॅंक खात्यातील पैसे काढून घेतले आहेत.
धीरजचा कसून शोध 

कौस्तुभचा सहकारी धीरज पाटील अजूनही गायब आहे. त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. कौस्तुभकडून त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT