Sangli Politics Jayant Patil esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Politics : होमग्राऊंडवरच जयंत पाटलांना भाजप नेत्यांचा 'दे धक्का'; राजकीय तर्क-वितर्कांना उधाण

२०१४ नंतर जिल्ह्यातील राजकारणात भाजपने बघता-बघता मुसंडी मारत दोन्ही काँग्रेसला दूरवर पिछाडीवर लोटले.

जयसिंग कुंभार

शरद पवार राष्ट्रवादीच्या राज्यातील फुटीनंतर प्रथमच सांगलीत आले होते. त्याचवेळी जयंत पाटील यांच्या होमग्राऊंडवर राष्ट्रवादीला सांगली-मिरजेत एकापाठोपाठ धक्के बसत आहेत.

सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या सांगलीतील स्टेशन चौकातील पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेस-राष्‍ट्रवादीचे नेते प्रदीर्घ काळानंतर सांगलीत एकाच व्यासपीठावर आले. त्याचवेळी ज्यांनी आयुष्यभर भाजपला (BJP) जिल्ह्यात बळ दिले, त्या जयंत पाटील (Jayant Patil) यांचा ‘जयंत जनता पार्टी’ शिक्का पुसत जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी आता स्वयंभू राजकारण सुरू करीत ‘दे धक्का’ दिला आहे.

कधी काळी जिल्‍ह्यात काँग्रेसअंतर्गतच गटातटाचे राजकारण असायचे. त्याला १९९९ नंतर मित्रपक्ष असूनही काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असे वळण मिळाले. मात्र २०१४ नंतर जिल्ह्यातील राजकारणात भाजपने बघता-बघता मुसंडी मारत दोन्ही काँग्रेसला दूरवर पिछाडीवर लोटले. आज विधानसभेत तीनही पक्षांचे समान बलाबल असले, तरी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांवर भाजपच्या वळचणीला कधी जातील, असे शंकाचे काहूर आहे.

आधी महाआघाडी आणि आता शिवसेना-राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय फुटीनंतर जिल्ह्यातील वातावरण अधिकच संभ्रमाचे झाले आहे. खुद्द जयंतराव पाटील, विश्‍वजित कदम आणि विशाल पाटील हे आगामी निवडणुकांवेळी ते त्यांच्या पक्षात असतीलच का, असे आज जिल्ह्यात संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे बापूंच्‍या पुतळा अनावरण कार्यक्रमांच्या निमित्ताने शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील कोणते नेते व्यासपीठावर असतील, याबाबत राजकीय वर्तुळात कुतूहल होते. कारण पवारांचा जिल्ह्यातील कोणताही कार्यक्रम असला तरी सर्वपक्षीय नेतेमंडळी कोठे ना कोठे हजेरी आजवर लावत आले आहेत.

पुतळा अनावरण कार्यक्रम महापालिकेचा म्हणजेच शासकीय होता. भाजपचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचा समारंभाचे अध्यक्ष होते. आजवर जयंतरावांच्या प्रत्येक कार्यक्रमात भाजपचे खासदार संजय पाटील यांची पक्षीय भेद पार करीत उपस्थिती असते. यावेळी भाजपच्या दोन्ही आमदार व खासदारांसह जिल्ह्यातील विलासराव जगतापांसह सर्व भाजप नेत्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे कालचे समारंभातील जिल्ह्यातील चित्र खासदार पाटील यांच्याच मताप्रमाणे आता जिल्ह्यात आता ‘नो जेजेपी ओन्‍ली बीजेपी’ असा असेल.

या कार्यक्रमात विश्‍वजित कदम हेच काँग्रेसच्या वतीने बोलले, तर विशाल पाटील व्यासपीठावर होते. खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर हेच एकमेव सत्तेतील नेते या समारंभात व्यासपीठावर होते. त्यांचे विरोधक माजी आमदार सदाभाऊ पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असूनही या समारंभास अनुपस्थित होते. यापुढे जयंतराव खरेच यावेळी काँग्रेससमवेत असतील का?, विशाल-विश्‍वजित यांची डिजिटल फलकांवरील एकी प्रत्यक्षात दिसेल का?, या प्रश्‍नांची उत्तरे मात्र शोधणे तूर्त तरी घाईचेच ठरेल, असे आजचे जिल्ह्याचे राजकीय वर्तमान आहे.

आता अजितदादांच्या ‘कार्यक्रमा’कडे लक्ष

शरद पवार राष्ट्रवादीच्या राज्यातील फुटीनंतर प्रथमच सांगलीत आले होते. त्याचवेळी जयंत पाटील यांच्या होमग्राऊंडवर राष्ट्रवादीला सांगली-मिरजेत एकापाठोपाठ धक्के बसत आहेत. विशेषतः इद्रिस नायकवडी, मैन्नुद्दीन बागवान, दिग्विजय सूर्यवंशी अशा तीन माजी महापौर आणि अनेक नगरसेवक अजितदादांच्या भेटी घेत आहेत.

जिल्ह्यातही राष्ट्रवादीचे अनेक नेते तळ्यात-मळ्यात अशा संभ्रमात आहेत. त्यामुळे लवकरच ‘नेतानिश्‍चितीचा समारंभ’ (कारण पक्षात फूट नाही, असे म्हणतात) अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे या गटाचे शहर-जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे उघडपणे सांगत आहेत. आता या गटात काँग्रेसचा मदन पाटील गट यावा, असेही प्रयत्न असल्याची उघड चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT