sangli rain update diwali weather rain forecast diwali stall damage loss inn lakh Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Rain News : सांगलीत जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी; दिवाळी पाण्यात

सांगली शहर व परिसरात तसेच जिल्हाभरात झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडाली

अजित कुलकर्णी

सांगली : सांगली शहर व परिसरात तसेच जिल्हाभरात झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडाली. सलग तीन तास झालेल्या या पावसाने दिवाळीसाठी सजलेल्या व्यापारी पेठात पूर यावा, तसे पाणी साचले. त्यामुळे स्टॉलधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे चित्र होते. कालपासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण कायम आहे.

याचा फटका द्राक्षबागांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. सांगली जिल्ह्यात १ लाख २५ हजार एकरावर द्राक्षबागा आहेत. पावसाने फुलोरा अवस्थेत असलेल्या बागात डाऊनी व घडकूजीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. गुडघ्याएवढे पाणी साचल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे.

या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह फेरीवाले, व्यापारी यांचेही मोठे नुकसान झाले आहे. मुळात सांगली महापालिकेने आंबेडकर क्रीडांगणावर स्टॉल लावण्याची व्यवस्था केली आहे. मात्र प्रचंड पावसाने विक्रेत्यांना साहित्य पाण्यातून हलवावे लागले. त्याचा फटका विक्रेत्यांना बसला.

कालपासून बाजारात खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र प्रचंड पावसामुळे या सर्व खरेदीवर विरजण पडले. शहरातील प्रसिध्द मारुती रस्त्यावर पावसाने प्रचंड पाणी साठल्याने दिवाळीसाठी सजलेल्या मुख्य व्यापारी पेठेची दैना उडाली. व्यापाऱ्यांच्या दुकानातही पाणी घुसले. तात्पुरते उभारलेले मंडपासह स्टॉलचे नुकसान झाले. स्टेशन चौक, कापड पेठ, विश्रामबाग, विजयनगर येथील बाजारपेठेत ऐन दिवाळीत विक्रेत्यांचे हाल झाल्याचे चित्र होते. शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरात पाण्याचे लोट वाहत होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बॉलिवूड गाजवलेल्या 'या' अभिनेत्रीच्या पालक आणि भावाची नातेवाईकांनीच केलेली हत्या ! हालअपेष्टांनी वेढलेलं आयुष्य

Ambad News: अंबडमध्ये दुमजली इमारत कोसळली; दोनजण जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

Pune Crime : फटाके वाजवण्यावरून वाद; हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

Rohit Sharma - Virat Kohli: 'थँक यू ऑस्ट्रेलिया! परत येऊ की नाही माहित नाही, पण...', सिडनीतील विजयानंतर विराट-रोहित झाले व्यक्त

Crime: आई आणि काकाला नको त्या अवस्थेत पाहिलं; लेकाचा पारा चढला, रागाच्या भरात भलतंच घडलं

SCROLL FOR NEXT