rajesh tope.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोना वाढीचा सांगलीचा दर राज्याच्या दुप्पट.. आरोग्य मंत्री राजेश टोपे 

विष्णू मोहिते

सांगली,  : कोरोनाचा वाढीचा दर हा राज्याचा 2 टक्के तर सांगली जिल्ह्याचा दर 4 टक्के आहे. रुग्ण दुप्पटीचा दर राज्याचा जवळपास 30 दिवसांचा आहे. तर जिल्ह्याचा 17 दिवसांचा आहे. याचा अर्थ सांगलीत मोठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी कॉन्टक्‍ट ट्रेसिंग व टेस्टिंग मिशन मोड करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. त्यासाठी कॉन्टक्‍ट रेशो हा 8.87 वरुन किमान 15 पर्यंत गेला पाहिजे, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले 

सध्या सांगलीचा कोरोनाचा चढता आलेख शिस्तबध्द रितीने काम सुरु ठेवून नक्कीच खाली आणू शकतो, असा विश्वासहीत्यांनी आज व्यक्त केला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर येथे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी आढावा बैठक घेतली. पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशिल माने, आमदार सदाभाऊ खोत, अनिल बाबर, मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनिस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर ननंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी भूपाल गिरीगोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. टोपे म्हणाले,""कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अग्रेसिव्ह कॉन्टक्‍ट ट्रेसिंग व टेस्टिंग हा चांगला उपाय आहे. तो योग्यप्रकारे करावा, 24 तास टेस्टिंग सुरु करण्यासाठी असणाऱ्या अडचणी सोडवाव्यात, मृत्यदर कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावेत. जिल्ह्याचा मृत्युदर सध्या 3 ते 3.5 टक्के आहे. तो 1 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आणण्याचा प्रयत्न करा. जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या 400 खाटांच्या रुग्णालयासाठी सकारात्मक असलो तरी, खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा कोव्हिड उपचारांसाठी उपलब्ध करुन घ्याव्यात. इंडियन मेडिकल असोशियेशनमधील जास्तीत जास्त खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचा उपयोग करुन घ्यावा, असे निर्देश देऊन त्यांनी खासगी रुग्णालये सध्या रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. तसे न करता त्यांना पॉईंट ऑफ केअरलाच अन्टीजेंन टेस्ट कराव्यात व रुग्णावर आत्मविश्वासाने उपचार करावेत असे सांगितले. 
लेखा पथकांनी अधिक प्रभावी कामगिरी करुन, लोकांकडून अवाजवी दर आकारणी होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. स्वॅब तपासणी करुन अहवाल रुग्णांना मिळण्याचा कालावधी कमी करावा. टेलिरेडिओलॉजीची सुविधा लवकरच महाराष्ट्रात उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

श्री. टोपे यांनी कंन्टेमेंन्ट झोनचा कालावधी रुग्ण सापडल्यापासून 14 दिवस केल्याचे सांगून अंमलबजावणी करावी, अशी सूचना दिल्या. सर्व डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना नातेवाईकांशी संवाद साधण्याची यंत्रणा ताबडतोब करावी, असेही सांगितले. शासकीय रुग्णालयांत सामान्य माणूस जात असल्याने या ठिकाणी आयसीयुची सुविधा वाढवावी, असेही त्यांनी सूचित केले. 

पालकमंत्री जयंत पाटील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या सूचनांचे व निर्देशांचे तंतोत पालन करुन कॉन्टक्‍ट ट्रेसिंग रेशो 20 ते 25 पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करावा. अँन्टीजेंट टेस्ट वाढवाव्यात, रुग्ण व नातेवाईकातील संवादाची यंत्रणा तात्काळ सुरु करावी, असे सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यातील सद्यस्थिती माहिती दिली.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War : 'भारतासाठी ही स्थिती चिंताजनक, युद्ध थांबले नाही तर देशावर त्याचे गंभीर परिणाम होणार'; PM नरेंद्र मोदी यांचा इशारा

Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; युद्धस्थिती शमल्याचा परिणाम

Latest Marathi News Live Update : हरीश राणा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी 'ग्रीन पार्क स्मशानभूमीत आणले

Dhurandhar Movie Controversy: बॉक्स ऑफिसवर गाजणारा ‘धुरंधर’ आता कायद्याच्या रडारवर; बंदी घालण्याची मागणी

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

SCROLL FOR NEXT